Pune crime : शिवीगाळ केली म्हणून काचेनं गळा चिरून निर्घृण खून; पुण्याच्या नऱ्हेतल्या व्यसनमुक्ती केंद्रातला धक्कादायक प्रकार

आपल्याच सहकाऱ्याचा काचेच्या (Glass) तुकड्याने गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील नऱ्हे याठिकाणी घडला आहे. शिवीगाळ केल्याच्या रागातून एका व्यसनमुक्ती केंद्रात गुरुवारी पहाटे एकाने त्याच्या सहकार्‍याचा काचेने गळा चिरला.

Pune crime : शिवीगाळ केली म्हणून काचेनं गळा चिरून निर्घृण खून; पुण्याच्या नऱ्हेतल्या व्यसनमुक्ती केंद्रातला धक्कादायक प्रकार
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 1:58 PM

पुणे : आपल्याच सहकाऱ्याचा काचेच्या (Glass) तुकड्याने गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील नऱ्हे याठिकाणी घडला आहे. शिवीगाळ केल्याच्या रागातून एका व्यसनमुक्ती केंद्रात गुरुवारी पहाटे एकाने त्याच्या सहकार्‍याचा काचेने गळा चिरला. हा खून इतका निर्घृण होता, की काचेने गळा कापल्यानंतर संबंधिताने त्या व्यक्तीच्या घशात बोटे घालून तो फाडला. पहाटे साडेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. अरुण मोहन राठी (वय. 65, रा. अनुबंध सोसायटी, सिंहगड रोड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad road police) संकेत सुनिल आल्हाट (वय. 24, रा. स्वामी नारायण मंदिराच्या मागे, नर्‍हे) याला अटक (Arrest) केली आहे. याबाबत एका 53 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. याप्रकरणी संकेत आल्हाटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिवशी कोणीही भेटायला आले नसल्याने तणावात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्यसनमुक्ती केंद्र नऱ्हे येथील एका निवासी इमारतीत आहे. तेथे वेगवेगळ्या सदनिकांमध्ये सुमारे 45 व्यक्ती उपचार घेत आहे. यातील एका सदनिकेत उपचार घेणारे बारा जण राहात होते. 16 एप्रिल रोजी आल्हाट याचा वाढदिवस होता. त्या दिवशी घरातील कोणी त्याला भेटायला आले नव्हते. त्यामुळे तो तणावात असताना, राठी हे त्याला शिवीगाळ करत होते. त्याचा राग आल्हाट याच्या मनात होता.

साडे तीनच्या दरम्यानची घटना

गुरुवारी रात्री राठी गाढ झोपले होते. मात्र आल्हाट साडेतीनच्या सुमारास जागा झाला. तो थेट राठी झोपलेल्या ठिकाणी गेला. राठी गाढ झोपेत असताना त्यांच्या तोंडावर टॉवेल ठेवला. यानंतर काचेच्या तुकड्याने त्यांचा गळा चिरला. आवाजाने इतर सहकारी जागे झाले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.

आणखी वाचा :

Pune crime : सोनं अन् मोबाइल लुटणारे 24 तासांत गजाआड; लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटजवळ शस्त्रांचा धाक दाखवून करत होते चोरी

kalyan Accident : चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टपरीत घुसला टेम्पो, चालक पोलिसांच्या ताब्यात

आई होऊ न शकल्यानं महिला डॉक्टरची आत्महत्या! स्वतःच विषारी इंजेक्शन टोचून घेत जीव दिला

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.