Pune crime : रेकॉर्डवरचा गुन्हेगार जूनमध्ये काढतो बाइक रॅली, गुन्हा दाखल ऑगस्टमध्ये..! पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचं वरातीमागून घोडं!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस असतील किंवा अन्य पोलीस स्टेशनचे अधिकारी... हे खुद्द पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

Pune crime : रेकॉर्डवरचा गुन्हेगार जूनमध्ये काढतो बाइक रॅली, गुन्हा दाखल ऑगस्टमध्ये..! पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचं वरातीमागून घोडं!
गुंड सोन्या काळभोर (पांढरा शर्ट)/पोलीस आयुक्त अंकुश शिंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 2:20 PM

पुणे : दहशत पसरवण्यासाठी गुंडांनी बाइक रॅली (Bike rally) काढली, मात्र पोलिसांना त्याचा पत्ताच नसल्याचे समोर आले आहे. कारण जूनमध्ये काढलेल्या रॅलीचा गुन्हा ऑगस्टमध्ये दाखल झाला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त (Pimpri Chinchwad Police Commissioner) तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा शहरातील गुंड आणि अवैध धंद्यांवर वचक आहे, की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटना सातत्याने घडत आहे. आगामी महापालिका निवडणूक (PCMC election) जवळ आल्याने शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि त्यांचे पोलीस दल झोपेचे सोंग घेत आहे का, असे सवाल उपस्थित होत आहेत. पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड सोन्या काळभोर याच्या टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार जीवन सातपुते याने ही रॅली काढली होती.

पोलीस नेमके काय करत आहेत?

जेलमधून सुटका झाल्यानंतर दोन महिन्यापूर्वी म्हणजेच 15 जून 2022ला आकुर्डी परिसरात कुख्यात गुंड सोन्या काळभोर याने मोटार सायकल रॅली काढली. या रॅलीचा उद्देश परिसरामध्ये दहशत पसरवण्याचा होता. मात्र सातपुतेने एवढी मोठी रॅली काढली तरी पोलिसांना त्याची काहीच कल्पना नव्हती. अखेर गेल्या काही दिवसात या रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी जीवन सातपुते याच्याविरोधात निगडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कुख्यात गुंडांच्या टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अशा रॅली काढत असेल तर पोलीस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अवैध धंदे राजरोसपणे सुरू

विशेष म्हणजे या रॅलीच्या सुरुवातीला गुन्हे शाखेचा एक पोलीसही गुंडांशी गप्पा मारताना दिसत आहे. तरीदेखील गुन्हा दाखल करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी का लागला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसापासून पिंपरी चिंचवड शहरात अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे देखील अनेकदा समोर आला आहे. हे सर्व अवैध धंदे आणि गुंडगिरी मोडून काढण्याचा दावा करणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा आपल्याच आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वचक आहे, की नाही असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

हे सुद्धा वाचा

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली?

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस असतील किंवा अन्य पोलीस स्टेशनचे अधिकारी… हे खुद्द पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आता आयुक्तालयातील आपल्या कर्मचाऱ्यांना कशी शिस्त लावतात, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.