Pune accident : हॅण्ड ब्रेक न लावताच चहा घ्यायला गेला, अन् बिबवेवाडीतल्या उतारावरच्या रस्त्यावरून ट्रॅक्टर सात वाहनांना धडकला!
ट्रॅक्टरचा वेग इतका वाढला, की त्याने जवळपास सात वाहनांना धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पुणे : पुण्यातील बिबवेवाडी येथील अप्पर जुना बस स्टॉप येथे एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. ट्रॅक्टरच्या झालेल्या या अपघातात एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. बिबवेवाडीतील अप्पर जुना बस स्टॉप येथे एक ट्रॅक्टर चालक आपली ट्रॅक्टर उभा करून चहा घ्यायला गेला, मात्र तो हॅन्ड ब्रेक (Break) लावायला विसरला आणि तसाच निघून गेला. दुर्दैवाने तो सगळा रस्ता उताराचा असल्याने तो ट्रॅक्टर आपोआप पुढे गेला आणि उतार असल्याने त्या ट्रॅक्टरचा वेग प्रचंड वाढला आणि त्या ट्रॅक्टरने सहा वाहनांना धडक दिली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशन (Bibwewadi Police Station) येथे गुन्हा दाखल झाला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुन्हा दाखल
याबाबत सविस्तर माहिती अशी, की एका ट्रॅक्टर चालकाला चहा प्यायचा होता. त्यामुळे संबंधित ट्रॅक्टर चालकाने भररस्त्यात उतारावर आपला ट्रॅक्टर थांबविला. त्यानंतर चालक चहा घेण्यासाठी गेला. त्यावेळी उतारावरून ट्रॅक्टर अचानक खाली जावू लागला. ट्रॅक्टरचा वेग इतका वाढला, की त्याने जवळपास सात वाहनांना धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बेजबाबदार कृत्याबद्दल ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यातदेखील घेतले.
कसा झाला अपघात?
पुण्यातील बिबवेवाडी येथील अप्पर जुना बस स्टॉप येथे हा भीषण प्रकार घडला. ट्रॅक्टरच्या झालेल्या या अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. ट्रॅक्टर चालक आपला ट्रॅक्टर उभा करून चहा घ्यायला गेला त्यावेळी तो हॅन्ड ब्रेक लावायला विसरला आणि तसाच चहा घेण्यास निघून गेला. ज्या ठिकाणी ट्रॅक्टर उभा केला होता, तो रस्ता उताराचा असल्याने ट्रॅक्टर आपोआप पुढे गेला आणि सात वाहनांना धडकला. याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.