Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad crime | मेट्रोमोनिअल साईटवरून ओळख मग लग्नाच्या आणाभाका अन…. बलात्कार करून आरोपी फरार ; नेमकं काय घडलं

पीडित तरुणीने घरच्यांना सांगितली. त्यानंतर पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांना जास्त भेटायला लागले. दरम्यान, आश्विकने पीडितेसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली. पण, आपण अगोदर लग्न करू मगच शारीरिक संबंध ठेवू यावर तरुणी ठाम होती. तिने तसं आरोपीला सांगितलं आणि संबंध ठेवण्यास नकार दिला.

Pimpri Chinchwad crime | मेट्रोमोनिअल साईटवरून ओळख मग लग्नाच्या आणाभाका अन....  बलात्कार करून आरोपी फरार ; नेमकं काय घडलं
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 4:37 PM

पिंपरी- शिरूरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच पिंपरीत कारमध्ये 30  वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी व आरोपीची मेट्रोमोनिअल साईटवरून ओळख झाली होती. या प्रकरणी वाकड पोलिसात पीडित तरुणीने तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यात ओळख वाढत गेली. दोघे ही दररोज व्हॉटसऍप चॅटिंग करत आणि एकमेकांसोबत कार मधून फिरायचे.

तर घडलं असं की

पिंपरी-चिंचवड मधील वाकड परिसरात संबंधित तरुणी वास्तव्यास आहे. पीडित तरुणीने लग्न जमावण्यासाठी मेट्रोमोनिअल साईटवर आपले नाव नोंदविले होते. तरुणीचेप्रोफाईल बघून आरोपीने तिला रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर तरुणीनेही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली यातूनच दोघांची मैत्री झाली. आरोपीने तरुणीला सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ अग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर येथे डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत असल्याचे सांगत तरुणीला विश्वास पटवून दिले. त्यांच्यात ओळख वाढत गेली. दोघे ही दररोज व्हॉटसऍप चॅटिंग करत आणि एकमेकांसोबत कार मधून फिरायला लागले. पुढे तरुणाने तू मला आवडतेस आपण लग्न करू” अस पीडितेला सांगितलं. ही बाब, पीडित तरुणीने घरच्यांना सांगितली. त्यानंतर पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांना जास्त भेटायला लागले. दरम्यान, आश्विकने पीडितेसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली. पण, आपण अगोदर लग्न करू मगच शारीरिक संबंध ठेवू यावर तरुणी ठाम होती. तिने तसं आरोपीला सांगितलं आणि संबंध ठेवण्यास नकार दिला.

स्टार्टपसाठी घेतले 8 लाख रुपये पीडित तरुणी सोबत आरोपीची हत असलेल्याघट मैत्री झाल्यानंतर आरोपीने तरुणीला आपण एक व्यवसाय करू असं पीडितेला आश्विकने सुचवलं. कस्टममधील आलेल्या वस्तू कमी किमतीत घेऊन त्यांच्या विक्रीचा व्यवसाय करू असं पीडित तरुणीला सांगितलं. त्यासाठी मी 30 लाख रुपयांची जुळवाजुळव केली असून 10 लाख रुपये कमी पडत असल्याचे सांगत “तू मला मदत कर” असे आरोपीने सांगितले. तेव्हा, पीडितेने त्यास नाही असं स्पष्ट सांगितलं. मात्र, त्याने आपलं लग्न होणार असून भविष्यासाठी चांगलं असून आपलं आयुष्य सेट होईल असं सांगत विनवणी केली. त्यानंतर, पीडित तरुणीने आरोपीला 8  लाखांची मदत केली. त्यानंत 15- 16 सप्टेंबर 2021  रोजी वाकड परिसरातील नामांकित हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत कार थांबवून पीडित तरुणीसोबत विरोध केला असता बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरुणीला भेटणे कमी केले.

आरोपी फ्लॅट सोडून गेल्याचे समोर आले

आईला कोविड झाला असून मध्य प्रदेश येथे गेल्याचं आश्विकने सांगितलं. तो पुण्यात आल्यानंतर भेटतो असं म्हणाला होता परंतु, त्यानंतर आरोपीचा मोबाईल नंबर बंद येत होता. त्यानंतर संबंधित तरुणी ते राहत असलेल्या पत्त्यावर पोहचले असता आरोपी फ्लॅट सोडून गेल्याचे समोर आले. तेव्हा तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले बलात्कार, तसेच आर्थिक फसवणूक झाल्याने संबंधित तरुणी नैराश्यात गेली. मात्र तिन स्वतःला सावरत पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवतआरोपी व त्याच्या एका मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर हे अधिक तपास करत आहेत.

मोठी राजकीय अपडेट! मुंबई पालिकेसाठी भाजप मनसेसोबत युती करणार? फॉर्म्युलाही ठरला?

Chhagan Bhujbal | ‘ते’ लगेच गोडसेवादी झाले असे नव्हे, राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष कोण, भुजबळांचं नेमकं उत्तर!

वेगाने चालल्यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका 34 टक्क्यांनी होतो कमी; जाणून घ्या काय सांगतो अहवाल?

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.