Rohit Pawar | आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर मध्यरात्री कारवाई, मध्यरात्रीच कशामुळे झाली कारवाई?

MLA Rohit Pawar | आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर मध्यरात्री कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे राजकीय गटात खळबळ उडाली आहे. स्वत: रोहित पवार यांनी एक्सवर या कारवाईसंदर्भातील महिती देत काही प्रश्न उपस्थित केले.

Rohit Pawar | आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर मध्यरात्री कारवाई, मध्यरात्रीच कशामुळे झाली कारवाई?
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 2:28 PM

पुणे | 28 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर बुधवारी मध्यरात्री कारवाई झाली. या कारवाईची माहिती स्वत: रोहित पवार यांनी X वर (ट्विटर) दिली. रोहित पवार यांनी या कारवाई संदर्भात दोन राजकीय नेत्यांचा उल्लेख केला आहे. नाव न घेता त्यांनी या राजकीय नेत्यांमुळे ही कारवाई झाली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मध्यरात्री झालेल्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोणत्या कंपनीवर झाली कारवाई

आमदार रोहित पवार यांची बारामती ॲग्रो ही कंपनी आहे. या कंपनीच्या बारामती येथील प्लॅन्टवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने कारवाई केली. प्रदूषण मंडळाकडून रात्री २ वाजता आमदार रोहित पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. या नोटिशीत बारामती ॲग्रो या कंपनीचा प्लॅन्ट ७२ तासांत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणतात रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर या कारवाईची माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाली आहे. द्वेष मनात ठेवून एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीवर पहाटे दोन वाजता कारवाई झाली. एखादी भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, हे माझ्या युवा मित्रांना सांगू इच्छितो. मी घेतलेल्या भूमिकेमुळे ही कारवाई होत आहे. परंतु अशा काही अडचणी आल्या तर मी संघर्ष थांबवेल, असे नाही. मराठी माणसाचे वैशिष्ट म्हणजे ते भूमिका बदल नाही. माझ्या लढा सुरुच राहणार आहे.

वाढदिवसाआधी कारवाई

रोहित पवार यांचा २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्याचा एक दिवस आधी ही कारवाई झाली आहे. त्यावर रोहित पवार यांनी म्हटले आहे की, माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो. आता जनता सरकारला ‘रिटर्न गिफ्ट’ देणार, याची मला खात्री आहे.

दरम्यान रोहित पवार यांनी दोन राजकीय नेत्यांचा उल्लेख केला आहे. परंतु त्यांची नावे घेतली नाही. हे दोन राजकीय नेते कोण? हे नेते पुणे जिल्ह्यातील आहे की बाहेरील? यासंदर्भात आता तर्कवितर्क लढवले जात आहे.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.