AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर असे फोटो शेअर करणे दोघांना पडले महागात, खावी लागली पोलीस ठाण्याची हवा

Pune Cirme News : सोशल मीडियाची क्रेझ तरुणाईमध्ये चांगलीच आहे. आपले फोटो सातत्याने सोशल मीडियावर तरुणाई अपडेट करीत असतात. परंतु दोन जणांना असे फोटो अपडेट करणे चांगले अंगलट आलेय.

सोशल मीडियावर असे फोटो शेअर करणे दोघांना पडले महागात, खावी लागली पोलीस ठाण्याची हवा
पुण्यात नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळला
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 2:07 PM

पुणे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहे. अनेक जण सोशल मीडियावर आपले अनेक फोटो टाकत असतात. परंतु सोशल मीडियावर फोटो टाकताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण पुणे शहरातील दोन तरुणांना सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंमुळे कारागृहाची हवा खावी लागली. राज्य पोलिसांचे लक्ष तुमच्या सोशल मीडिया अकांऊटवर असते. त्यामुळे गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण करणारे फोटो दिसल्यास त्वरित कारवाई होत आहे.

काय आहे पुणे येथील प्रकार

पुणे शहरातील दोन तरुणांनी आपले फोटो सोशल मीडियावर टाकले. शस्त्रांसह त्यांनी हे फोटो शेअर केले. पोलिसांना हा प्रकार समजला. त्यानंतर अरशद शरीफ पटेल (वय २१) उमर सलमी शेख (वय १९) या दोन्हांना उरळी देवाची भागातून अटक करण्यात आली. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांचे ऑपरेशन अन्…

पुणे पोलिसांनी ८ जुलै रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. त्यावेळी पोलिसांना दोन तरुण शस्त्रांसह आपले फोटो शेअर करत असल्याची माहिती मिळाली. हडपसर विभागानेच पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी त्यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी असे फोटो शेअर केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्र जप्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

कोयता गँगमुळे पोलिसांचे लक्ष

पुणे शहरात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे कोयता गँगचा निपटारा करण्यासाठी पोलिसांचे बारीक लक्ष गुन्हेगारांवर आहे. पुणे शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांचे अनेक प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी आयुक्त रस्त्यावर उतरले. अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.