Pune : पुणे महापालिकेवर प्रशासक आल्यापासून कारवाईचा धडाका, डीपी रस्त्यावरची अतिक्रमणं केली जमीनदोस्त
पुणे महानगरपालिकेच्या (PMC) हद्दीत अतिक्रमण विरोधातील कारवाई जोरात सुरू झाली आहे. महापालिकेवर प्रशासक आल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे. डीपी रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण केलेल्या घरांवर, दुकानांवर, हॉटेलवर कारवाई करण्यात येत आहे.
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) हद्दीत अतिक्रमण विरोधातील कारवाई जोरात सुरू झाली आहे. महापालिकेवर प्रशासक आल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे. डीपी रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण केलेल्या घरांवर, दुकानांवर, हॉटेलवर कारवाई करण्यात येत आहे. शहरात सगळीकडे अतिक्रमण (Encroachment) कारवाई जोरात सुरू आहे. पुणे महापालिका सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपली. त्यानंतर नगरविकास विभागाने प्रशासक म्हणून आयुक्त (Commissioner) विक्रम कुमार यांची नियुक्ती केली आहे. शहराच्या विविध भागांतील अतिक्रमणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावेळी मोठा फौजफाटा घेऊन ही अतिक्रमणे काढली जात आहेत. मर्यादेपेक्षा अधिक, अनधिकृत बांधकामे दुकानदारांकडून केली जातात. तसेच घरांच्या बाबतही आढळून आले आहे. त्यांच्यावर आता हातोडा पडत आहे. बेकायदा बांधकामांची गय केली जाणार नाही, असा संदेशच यानिमित्ताने महापालिकेकडून देण्यात आला आहे.
धानोरीत अतिक्रमण कर्मचाऱ्यांवर झाला होता हल्ला
29 मार्चरोजी शहरातील धानोरी परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू होती, यावेळी कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याला प्रकार घडला आहे. अतिक्रमण कारवाईवेळी स्थानिक नागरिक भडकले होते आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नंतर सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे. अतिक्रमण हटवताना असे प्रकार घडत असल्याने अतिक्रमण हटवणे पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. गेल्या काही दिवसात असे अनेक प्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.