तुम्हाला लस किती रुपयात मिळणार? अदर पुनावालांनी 200 रुपयांचं गणित सांगितलं

सीरम इनस्टिट्यूटचे अदर पुनावालांनी कोरोना लसीचा डोस 200 रुपयांना देण्यामागील गणित सांगितले आहे. Adar Poonawala covishield

तुम्हाला लस किती रुपयात मिळणार? अदर पुनावालांनी 200 रुपयांचं गणित सांगितलं
अदर पुनावाला
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 11:30 PM

मुंबई: सीरम इनस्टिट्यूटचे अदर पुनावालांनी 200 रुपयाला लसीचा एक डोस देण्यामागील कारण सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्पादन खर्चावर कोरोना लस उपलब्ध करुन दिली असल्याचं सांगितले. देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा उद्देश असल्याचंही अदर पुनावालांनी सांगितले. दर महिन्याला 7 ते 8 कोटी डोस तयार करण्याची क्षमता असून इतर देशांनाही लसीचा पुरवठा करायचा आहे, असंही पुनावालांनी सांगितेल. प्रायव्हेट मार्केटमध्ये कोरोना लसीचा एक डोस 1 हजार रुपयांना मिळेल. (Adar Poonawala explained why covishield one dosage prize decided two hundred rupees)

ऐतिहासिक क्षण

सीरम इनस्टिट्यूटमधून कोरोना लस देशातील वेगवेगळ्या भागात पोहोचवली जात आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे, असंही अदर पुनावाल म्हणाले. 2021चे वर्ष आपल्यापुढील आव्हानात्मक वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिले 10 कोटी डोस 200 रुपयांना देण्यात येणार आहेत, असंही पुनावाला म्हणाले. देशातील प्रत्येक व्यक्ती, गरीब, आरोग्य कर्मचाराी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचंही पुनावाला म्हणाले. दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेमध्ये लसीचा पुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचंही पुनावालांनी सांगितलं. सीरम इनस्टिट्यूटमधून आज सकाली तीन ट्रकमधून कोविशील्ड लस पुणे विमानतळावर पोहोचली. तिथून कोविशील्ड लस देशभरात पोहोचवण्यात येत आहे.देशातील 13 ठिकाणांवर लस पोहोचवली जाणार आहे.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

सीरम इनस्टिट्यूटला केंद्र सरकारनं कोविशील्ड लसीचा पुरवठा करण्यासाठी ऑर्डर दिली आहे. सीरम इनस्टि्टयूटच्या अधिकाऱ्यांनी कोरोना लसीचा एक डोस 200 रुपयांना देण्याचं जाहीर केले होते. सुरुवातीला सीरमकडून 1 कोटी 10 लाख डोस पुरवठा करण्यात येणार आहे.

दरम्यान, ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडून कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी दोन संस्थांच्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मंजुरी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

अवघ्या चार दिवसात भारतात कोरोनावरील लसीकरणास सुरुवात, संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष

कोरोना लसीच्या वाहतुकीसाठी पुण्यात खास ट्रक्स; उद्या पहाटे लसीची पहिली खेप होणार रवाना?

Adar Poonawala explained why covishield one dosage prize decided two hundred rupees

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.