जिलेटीन स्फोट प्रकरणात अंबानींची तक्रार कुठाय?; वाझे प्रकरणात राजकारण; असीम सरोदेंकडून काही सवाल

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अॅड. असीम सरोदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (adv. asim sarode raise some questions on Ambani bomb scare case)

जिलेटीन स्फोट प्रकरणात अंबानींची तक्रार कुठाय?; वाझे प्रकरणात राजकारण; असीम सरोदेंकडून काही सवाल
असिम सरोदे, वकील
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 2:48 PM

पुणे: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अॅड. असीम सरोदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जिलेटीन स्फोट प्रकरणात अंबानी यांची तक्रार कुठे आहे? असा सवाल करतानाच सचिन वाझेंच्या प्रकरणात राजकारणच अधिक होताना दिसत आहे, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. (adv. asim sarode raise some questions on Ambani bomb scare case)

असीम सरोदे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. घराबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणी अंबानी यांनी लेखी तक्रार केली आहे का? पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट घेतलं आहे का किंवा अंबानी यांनी त्यांचंच स्टेटमेंट दिलं आहे का? हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. ज्यांच्याविरोधात कट रचला गेलाय त्यांची स्टेटमेंटच नाहीये. त्यामुळे या प्रकरणात राजकारण होत असल्याचं दिसून येतं, असं सरोदे म्हणाले.

एनआयएने राष्ट्रीय गुन्ह्यांचा तपास करावा

सचिन वाझेच्या कारवाईत राजकारण जास्त दिसतंय. कायद्याचा राजकारणासाठी आपल्या सोयीनुसार वापर केला जातोय, असं सांगतानाच खरंतर एनआयएनं राष्ट्रीय गुन्ह्याचा तपास करणं अपेक्षित आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सुमार दर्जाच्या नेत्यांकडून नार्कोची मागणी

वाझे यांनी काही चूक केलं असेल तर त्यांना शिक्षा मिळणारच. मात्र, त्यासाठी त्यांची नार्को टेस्टची मागणी काही सुमार दर्जाचे नेते करत आहेत. नार्को टेस्ट करणं हे बेकायदेशीर आहे. ही मागणी चुकीची आहे. सर्वोच्च न्यायालयाने सात वेगवेगळ्या प्रकरणात त्याबाबतचा निर्णय दिला आहे. तसेच मानवी हक्क आयोगानेही नार्को टेस्ट बाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्यामुळे नार्को टेस्ट होऊ शकत नाही. अशा नेत्यांनी चुकीची मागणी करून लोकांना अज्ञानाकडे नेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

जामिनासाठी अर्ज करू शकतात

वाझे आता नियमित जामिनासाठी अर्ज करू शकतात. त्यांची चौकशीसाठी गरज नसेल आणि ते तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार असल्याचं कोर्टाला वाटलं तर त्यांना जामीन मिळू शकतो, असंही सरोदे यांनी स्पष्ट केलं. (adv. asim sarode raise some questions on Ambani bomb scare case)

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नारायण राणेंचं अमित शहांना पत्रं

Sachin Vaze Arrested Updates : NIA सचिन वाझेंना घेऊन कोर्टाच्या दिशेने रवाना

 ‘या प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल,’ कंगनाचं मोठं वक्तव्य

(adv. asim sarode raise some questions on Ambani bomb scare case)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.