Lonavala Bhushi Dam : पाच जण वाहून गेल्यावर लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात मोठी Action

Lonavala Bhushi Dam : दोन दिवसांपूर्वी लोणावळा भुशी डॅम परिसरात मोठी दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. त्यानंतर प्रशानसाला खडबडून जाग आली आहे. त्यांनी कारवाई सुरु केली आहे. आठवड्यांच्या इतर दिवसांपेक्षा शनिवार-रविवार इथे जास्त गर्दी असते.

Lonavala Bhushi Dam : पाच जण वाहून गेल्यावर लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात मोठी Action
bhushi damImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 11:52 AM

लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. पावसाळ्यात लोणावळ्यातील भुशी डॅम परिसर नेहमीच पर्यटकांनी फुलून गेलेला असतो. आठवड्यांच्या इतर दिवसांपेक्षा शनिवार-रविवार इथे जास्त गर्दी असते. भुशी डॅम परिसरात असणाऱ्या धबधब्यावर भिजण्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अन्सारी कुटुंब उतरलं होतं. यावेळी पाऊस कोसळत होता. अचानक धबधबा असलेल्या भागात पाण्याचा प्रवाह वाढला आणि अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले. अन्सारी आणि सय्यद कुटुंब या ठिकाणी वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी आले होते.

या घटनेमुळे आनंद क्षणार्धात दु:खामध्ये बदलला. साहिस्ता लियाकत अन्सारी (36), मिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (13), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (8), अदनान अन्सारी (4), मारिया अन्सारी (9) वाहून गेले. या दुर्घटनेनंतर प्रशासनला खडबडून जाग आली आहे. त्यांनी तातडीने पावल उचलली आहेत.

काय कारवाई?

लोणावळ्यातील पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.

भुशी डॅम कोणाच्या मालकीच?

भुशी डॅम रेल्वेच्या मालकीचे असल्याने, त्यांनी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली आहे. वर्षविहारासाठी पर्यटक पावसाळ्यात भुशी धरण परिसराला पसंती देतात. मात्र या ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठी दाटी झाली होती. दोन दीवसापूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. याची गंभीर दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईवेळी रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.