Pune News | पुणे शहरात किती जणांवर कुत्र्यांचा हल्ला…पराग देसाई यांच्या मृत्यूनंतर माहिती समोर

Parag Desai death and pune dog bite | वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाई यांचे रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर पुणे शहरातील कुत्र्यांच्या हल्ल्याची माहिती समोर आलीय.

Pune News | पुणे शहरात किती जणांवर कुत्र्यांचा हल्ला...पराग देसाई यांच्या मृत्यूनंतर माहिती समोर
stray dog bite
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 10:14 AM

पुणे | 24 ऑक्टोंबर 2023 : वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाले. भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे ते पडले होते. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. रुग्णालयात उपाचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर सामाजिक क्षेत्र आणि उद्योग जगात चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच भटक्या कुत्र्यांचा विषय चर्चेत आला आहे. पुणे शहरात भटक्या कुत्र्यांनी किती जणांवर हल्ले केले आहेत, त्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.

किती पुणेकरांवर झाले हल्ले

पुणे मनपाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील नऊ महिन्यांत तब्बल 16 हजार 372 जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. मागील वर्षभरात भटक्या कुत्र्यांनी 16 हजार 569 जणांना चावे घेतले होते. त्या तुलनेत आता नऊ महिन्यांत चावा घेणाऱ्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पुणे महानगरपालिकेकडील नोंदीची ही माहिती आहे. अनेक प्रकरणांची नोंद मनपाकडे झालेली नाही. यामुळे भटक्या कुत्र्यांनी यासंख्येपेक्षा कितीतरी अधिक लोकांना चावे घेतले असण्याची शक्यता आहे.

भटक्या कुत्र्यांची संख्या घटली पण…

पुणे महानगर पालिकेने मे 2023 मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना केली होती. त्यानुसार शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे. पुणे शहरात 2018 मध्ये 3 लाख 15 हजार भटके कुत्री होते. परंतु आता 2023 मध्ये ही संख्या 1 लाख 79 हजार 940 झाली आहे. टक्केवारीत भटक्या कुत्र्यांची संख्या 42.87 टक्के घटली आहे. परंतु भटक्या कुत्र्यांनी हल्ले करण्याची संख्या वाढली आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांपासून पुणेकर सुरक्षित नाही.

हे सुद्धा वाचा

भटक्या कुत्र्यांकडून धोकाच जास्त

रस्त्यांवर असलेली भटकी कुत्रे कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करतात. वेगाने जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करुन हल्ला करतात. यामुळे अपघात होण्याचा घटनाही घडल्या आहेत. पुणे मनपाकडून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्जंतुकीकरण केले जाते. त्यामुळे भटकी कुत्री कमी होत असली तरी त्यांचे हल्ले वाढत असल्याचे चित्र दुसऱ्या बाजूला दिसत आहे. यामुळे पुणेकरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.