leopards in Chakan | तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद ; कंपनी कामगारांनी सोडला सुटकेचा निश्वास
बिबट्या पिंजऱ्यात कैद होताच कंपनीतील कामगार व वनविभागासह, पोलीस प्रशासनाचा जीव भांडयात पडला आहे. वन विभागाने सुरक्षितपणे बिबट्याला ताब्यात घेतले आहे.
पुणे – तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर चाकण एमआयडीसीतील बिबट्याला(leopards) जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department ) यश आले आहे.सकाळी 11:30 च्या सुमारास बिबट्याला यशस्वीरित्या बंद करण्यात आले. बिबट्या पिंजऱ्यात कैद होताच कंपनीतील कामगार व वनविभागासह, पोलीस प्रशासनाचा जीव भांडयात पडला आहे.नर जातीचा हा बिबट्या असून अडीच वर्ष वयाचा हा बिबट आहे या बिबट्या ला आता पुन्हा दुर नैसर्गिक आदिवासात सोडलं जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. वन विभागाने सुरक्षितपणे बिबट्याला ताब्यात घेतले आहे. चाकण एमआय डीसीतील मर्सिडीज बेंज कंपनीत पहाटेच्या सुमारास (Mercedes Benz) बिबट्या घुसल्याचे -पहाटेच्या सुमारास कंपनीच्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर हीबाब समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
कंपनीतील कामगारांना बाहेर काढले
घटनेची माहिती मिळताच कंपनीतील कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले होते . पहाटेच्या सुमारास कंपनी च्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली.मात्र हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यानंतर तातडीने वन विभाग पोलीस यांना घटनेचीमाहिती देण्यात आली. त्यानंतर बिबट्या मर्सिडीज बेंज कंपनीमधील बॉडी शॉप मध्ये असल्याची खात्री करण्यात आली. पुढे पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
नागरिकांवर हल्याची प्रकरणे
यापूर्वी जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, जुन्नर याभागात बिबट्या शेतात तर कधी कोंबड्याच्या खुराडयात , विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. एवढं नव्हे तर पाळीव प्राण्यांना फस्त करण्याबरोबरच , लहानमुलांसह नागरिकांवरही हल्ले केले आहेत. याबरोबरच पुण्यातील कात्रज बोगद्या येथेही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. जिल्ह्यातील भौगोलिक वातावरण तसेच उसाच्या शेतीमुळे मागील काही वर्षात बिबट्याचा अधिवास वाढला आहे.
Trupti Desai : ‘एकविसाव्या शतकात संकुचित विचार करत बसलो, तर कुटुंब नियोजनाच्या गप्पा हवेतच राहतील’