Maharashtra Rain : मोठ्या ब्रेकनंतर राज्यात पाऊस, हवामान विभागाने कुठे दिला यलो अलर्ट
IMD Weather forecast : राज्यात ऑगस्ट महिन्यात सुटीवर गेलेला पाऊस परतला आहे. शनिवारी सकाळापासून काही भागांत पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने काही भागांत यलो अलर्ट दिला आहे.
पुणे | 26 ऑगस्ट 2023 : राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस नव्हता. सुटीवर गेलेला पाऊस परतण्याची कोणतीही चिन्ह ऑगस्ट महिन्यात नसल्याचे हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. परंतु शुक्रवारी रात्रीपासून वातावरण बदलले. रात्रीपासून अनेक भागांत सुरु झाला. मुंबईत रिमझिम पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने शनिवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्याची गती वाढली असल्यामुळे पावसाला सुरुवात झाली आहे.
काही आहे हवामान विभागाचा इशारा
शनिवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला यलो अलर्ट असणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी दिला आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. तसेच 48 तासांत राज्यात हलक्या पावसाला होणार सुरुवात आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागात पाऊस सुरु आहे.
मुंबईत पावसाला सुरुवात
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परत एकदा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरच्या कांदिवली, बोरिवली, मलाड, गोरेगाव परिसरामध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पाऊस सुरू आहे. ठाणे, घाटकोपर, कुर्ला या भागातील सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे. तसेच अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागातीलही अधून मधून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
25 Aug, 9pm, latest satellite obs indicates scattered type clouds over parts of #Vidarbha, adj #Marathwada, south #Konkan & around, #Telangana, #KA & Coastal #AndhraPradesh.Possibilities of light rains with occasional mod type 🌧 pic.twitter.com/OrmMjsDlgX
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 25, 2023
अनिल पाटील भेटले केंद्रीय अर्थमंत्र्यांना
राज्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला होता. यामुळे राज्यात पावसाचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यावर दुष्काळाची भीती आहे. यामुळे राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेतली. राज्यातील दुष्काळी भागासाठी आपत्ती व्यवस्थापन व त्याअंतर्गत येणारी आर्थिक मदत राज्याला करावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यात 3 आठवडे पावसाचा खंड असल्यामुळे सोयाबीन आणि इतर पिकांच्या उत्पादनात 60 टक्के घट होण्याची शक्यता आहे.