Agnipath Scheme : ‘अग्निपथ’ योजना फायद्याची कशी? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं मराठी तरुणांना महत्वाचं आवाहन, नक्की वाचा

निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मराठी तरुणांना याबाबत महत्वाचं आवाहन केलंय. अग्निवीरच्या भरतीत मराठी तरुणांनी सहभागी व्हावं, ही एक संधी आहे, असं हेमंत महाजन यांनी सांगितलं आहे.

Agnipath Scheme : 'अग्निपथ' योजना फायद्याची कशी? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं मराठी तरुणांना महत्वाचं आवाहन, नक्की वाचा
अग्निपथ योजनेत सहभागी होण्याचं निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं आवाहनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 5:42 PM

पुणे : केंद्र सरकारकडून संरक्षण दलात अग्निपथ (AGNIPATH) योजनेची सुरुवात केली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. अग्निवीर म्हणून काम करत असताना त्यातून आत्मसात केलेले कौशल्य आणि अनुभव तरुणाना विविध क्षेत्रात रोजगार मिळवून देणार आहेत, असा दावा केंद्र सरकारकडून (Central Government) करण्यात आलाय. मात्र, बिहारसह देशातील काही भागात या योजनेला मोठा विरोध होताना पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये तर तरुणांनी रेल्वे जाळली. विरोधी पक्षाकडूनही संरक्षण दलाच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशावेळी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन (Hemant Mahajan) यांनी मराठी तरुणांना याबाबत महत्वाचं आवाहन केलंय. अग्निवीरच्या भरतीत मराठी तरुणांनी सहभागी व्हावं, ही एक संधी आहे, असं हेमंत महाजन यांनी सांगितलं आहे.

निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं आवाहन

निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मराठी तरुणांना आवाहन करताना सांगितलं की, अग्निवीर या भरतीमध्ये मराठी तरुणांनी सहभागी व्हावं. ही एक संधी आहे. यात नोकरी ही फक्त चार वर्षाची आहे. त्यामुळे सैन्याची क्षमता कमी होईल असं बोललं जातं. मात्र, हा प्रश्न आपण आता लष्करप्रमुखांवर सोपवू. पुढील तीन महिन्यात याची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यात चार वर्षानंतर भरतीच्या 25 टक्के जणांचं प्रमोशन होणार आहे. तर इतरांना केंद्रीय पोलीस दलात प्राधान्य दिलं जाणार आहे. इतर राज्यांनीही त्या त्या सरकारी भरतीत प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलंय. त्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा समावेश आहे. तरुणांनी याची तयारी करायला हवी. देशाची अर्थव्यवस्था वाढतेय. मात्र, नोकऱ्यांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे अग्निवीर भरतीत सहभागी व्हा, असं आवाहन हेमंत महाजन यांनी केलं आहे.

काय आहे अग्निपथ योजना?

>> अग्निपथ योजनेच्या भरतीसाठी 17 ते 21 ची वयोमर्यादा आहे

>> इच्छूक उमेदवार 10 वी किंवा 12 वी पास हवा

>> ही भरती चार वर्षांसाठी असेल

>> चार वर्षाच्या सेवेनंतर कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होईल

>> भरती झालेल्या जवानांपैकी 25 टक्के जवानांना लष्करी सेवेत सामावून घेतलं जाणार

अग्निपथ योजनेतील 8 महत्वाचे मुद्दे

  1. अग्निपथ ही सैन्यदल, हवाई दल आणि नाविकांची भरती करण्यासाठी संपूर्ण देशातील गुणवत्ता-आधारित भरती योजना आहे.
  2. अग्निपथ योजनेअंतर्गत युवकांना देशाच्या सशस्त्र दलांमध्ये नियमित सेवेची संधी पुरवली जाणार आहे.
  3. अग्निवीरमध्ये प्रशिक्षण कालावधीसह 4 वर्षांच्या सेवा कालावधीसाठी नोंदणी केली जाईल.
  4. या योजनेमुळे शिस्तबद्ध आणि पारदर्शक निवड प्रक्रियेसह सर्वोत्कृष्ट निवडीद्वारे युद्धाची तयारी सुधारेल.
  5. 25% पर्यंत अग्निविरांची चार वर्षानंतर केंद्रीय, पारदर्शक प्रणालीवर आधारित नियमित केडरमध्ये निवड केली जाईल.
  6. 100% उमेदवार नियमित केडरमध्ये नोंदणी करण्यासाठी स्वच्छेने अर्ज करता येईल.
  7. अग्निपथ योजना चौथ्या वर्षी ₹40,000 प्रति महिना अपग्रेडसह ₹30,000 प्रति महिना आकर्षक मासिक पॅकेज प्रदान करते.
  8. 4 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व उमेदवारांसाठी सेवा निधी संमिश्र आर्थिक पॅकेज.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.