नगरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रस्त्यावर, नियम मोडताना दिसला की कारवाई!
अहमदनगरमध्येही कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढलेली दिसून येत आहे. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत चालल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील रस्त्यावर उतरले आहेत. | Ahmednagar Corona
अहमदनगर : संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. काही शहरात आणि ग्रामीण भागांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. अशात अहमदनगरमध्येही कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढलेली दिसून येत आहे. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत चालल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील रस्त्यावर उतरले आहेत. (Ahmednagar Corona positive Cases increasing Collecter And SP on Street)
नगर शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झालीये. आज 327 (शनिवारी) रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकाच दिवसात 509 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत चालल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलोस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारलाय.
नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून आर्थिक दंड
मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात सरकारी कर्मचारी देखील आहेत. तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाहून अनेकांची धावपळ उडालीय. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून महिनाभरात 83 लाख दंड वसूल करून 66 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आलीये. तर 15 दिवसात 16 हजार लोकांवर कारवाई तर 28 लाख दंड आकारण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं.
एसपी आणि कलेक्टर साहेबांची रस्त्यावर उतरुन जनजागृती
मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे असल्याचं सांगत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती केली. शिवाय नागरिकांना कोरोनाचे सगळे नियम पाळण्याचं आवाहन करत जे नागिरक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय.
सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
कापड बाजार, जिल्हापरिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियम मोडणाऱ्या नागरिकांवर आणि कर्मचाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली. ज्या दुकानात मास्क वापरले जाणार नाही ते दुकान महिनाभर सील करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.
लग्न सोहळ्यात 50 पेक्षा जास्त लोक नाही
लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त गर्दी करू नये. त्यासाठी पोलिसांची मंगल कार्यालयात गस्त असणार आहे. गर्दी आढळल्यास यापुढील काही दिवस मंगल कार्यालय बंद केले जातील, असा इशाराही देण्यात आलाय.
(Ahmednagar Corona positive Cases increasing Collecter And SP on Street)
हे ही वाचा :
पालघरच्या आश्रमशाळेत कोरोनाचा स्फोट, 48 विद्यार्थ्यांपाठोपाठ 19 कर्मचारीही बाधित
पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या, अजितदादांची मोदी सरकारकडे मागणी