AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? अजित पवारांची गाडी पुन्हा घसरली, मान्यही केलं

अजित दादा ग्रामीण बाजात बोलताना कधी कधी भलतच बोलून जातात (Ajit Pawar Statement). याची प्रचिती याआधीही महाराष्टाला आली आहे. त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्याचा मनस्ताप त्यांनाही झाला आहे.

Video : मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार घंटा? अजित पवारांची गाडी पुन्हा घसरली, मान्यही केलं
अजित पवार म्हणतात तर काय देणार घंटा?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 11:16 AM

नावीद पठाण : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. मात्र अजित दादा ग्रामीण बाजात बोलताना कधी कधी भलतच बोलून जातात (Ajit Pawar Statement). याची प्रचिती याआधीही महाराष्टाला आली आहे. त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्याचा मनस्ताप त्यांनाही झाला आहे. ते त्यांनी भर सभेत अनेकदा बोलूनही दाखवलं आहे. सकाळी सातच्या आत मिटिंग घेणारा आणि धडाडीने काम करणारा नेते म्हणून अजित पवारांची ओळख आहे. मात्र हे अजित पवार तेवढ्याच धडाडीने स्टेजवर बोलतात. भर सभेत अजित पवार अनेकदा विरोधकांना ओपन चॅलेंज देतात. त्यांनी विजय शिवतारेंना (Ajit Pawar On Vijay Shivtare) पुन्हा आमदार न होऊन देण्याचं दिलेलं चॅलेंज अजूनही लोक विसले नाहीत. ते फक्त चॅलेंजच देत नाहीत. तर ते खरंही करून दाखवतात. मात्र कधी कधी बोलता बोलता दादांची गाडी एका ट्रॅकवरून कधी दुसऱ्या ट्रॅकवर जाते हे त्यांनाही कळत नाही. आज बारामतीतल्या सभेत पुन्हा त्याची प्रचिती आली आहे.

…तर काय देणार घंटा?

त्या भागातील निधी वाटपाबाबत बोलतना अजित पवार आज पुन्हा घसल्याचे पहायला मिळालं. विषय होता निधीवाटपाचा ती सगळी सुत्र सध्या आमदार दत्ता भरणे यांच्याकडे सोपण्यात आली आहे. त्यामुळे मामा इतर आमदारांचाही विचार करत जा, इतरांनाही निधी, असे सांगताना अजित पवार म्हणाले. मलाही भरणेंना निधी मागावा लगतो. कारण इथल्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. यावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले. इथल्या तिजोरीच्या चाव्या भरणेंच्या हातात असल्या तरी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? अजित पावारांनी असे म्हणताच समोर बसलेल्या कार्यकर्त्यांमद्ये हशा पिकला. त्यानंतर सावरत अजित पवारांनीच मान्य केलं की आता बोलता बोलता गाडी घसरायला लागली आहे. आणि पुन्हा ते ट्रॅकवर आले.

आधीची विधानेही चर्चेत

काही वर्षांपूर्वी अजित पवारांनी धरणातल्या पाणीसाठ्यावरून केलेल वक्तव्य अजूनही लोकांच्या लक्षात आहे. विरोधकांकडून तर वारंवार ठेवणीतल्या अस्त्रासारखा त्या वक्तव्याचा वापर होतो. अनेक नेत्यांची वादग्रस्त विधान अजूनही चर्चेत असतात. अजित पवारांच्या त्या विधानालाही महाराष्ट्र अजून विसरला नाही, आणि कदाचित पुढेही विसरणार नाही. पण आता अजित पावर घसरले तरी सावरत पुन्हा ट्रॅकवर येतात. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर मात्र काही काळ कार्यकर्त्यांना हसू आवरेना झालं.

राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत, शिवसेना बायकोच्या तर काँग्रेस बिनबुलाये वऱ्हाडी, सुजय विखेंचा आघाडीवर घणाघात

काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालं, चंद्रकांत पाटलांकडून डायरीच्या चौकशीचीही मागणी

Video | कोरोना काळात मुंबई मनपाला लुटलं, Devendra Fadnavis यांचा शिवसेनेवर घणाघात, 24 महिन्यांत 38 मालमत्ता!

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं.
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल.
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ...
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ....
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला.
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट.
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.