Ajit Pawar | ‘टायगर इज बॅक’, आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री…कुठे झळकले बॅनर

Pune Ajit Pawar News | राज्यात बॅनरबाजीची चर्चा नेहमीच सुरु असते. प्रत्यक्षात नाही तर बॅनरच्या माध्यमातून भावी मुख्यमंत्री अनेक नेत्यांना केले गेले आहे. आता 'टायगर इज बॅक', आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री...बॅनर झळकले आहे.

Ajit Pawar | 'टायगर इज बॅक', आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री...कुठे झळकले बॅनर
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 4:38 PM

अभिजित पोते, पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा आधूनमधून सुरुच असते. विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार असल्याचे दावे केले जातात. त्या दाव्यांना काहीच अर्थ नसल्याचे भाजप आणि शिंदे गटाकडून वारंवार स्पष्ट केले जाते. या सर्व प्रकरणात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकवले जातात. आता पुन्हा ‘टायगर इज बॅक’, आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री…असे बॅनर झळकले आहे. पालकमंत्रीपदाचे वाटप झाल्यानंतर हे बॅनर झळकले आहेत.

कुठे झळकले बॅनर

“टायगर इज बॅक….असे बॅनर आता पुण्यात झळकले आहेत. विद्यामान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात हे बॅनर आहेत. “आजचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री”, अशा आशयाचे पोस्टर पुणे शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाकडून लावण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी हे बॅनर लावले आहे. त्यानंतर या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार होते नाराज?

चंद्रकांत पाटील यांना डच्चू देत अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री करण्यात आले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळत नसल्यामुळे अजित पवार नाराज होते. चंद्रकांत पाटील आणि अजित पवार या दोन दादांच्या भांडणात अजित पवार वरचढ ठरले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करु, पण आता नाही. आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवार समर्थकांमध्ये २०२४ नंतर अजित पवार मुख्यमंत्री असतील, असे बोलले जात आहे.

चंद्रकांत पाटील नाराज?

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी पुण्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे. परंतु पुण्यामधून चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री पदाचे महत्त्वकांक्षा असताना त्यांना थेट अमरावती आणि सोलापूरला पाठवले. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी अशा प्रकारची पोस्टरबाजी कितपत योग्य आहे? असा सवाल भाजप कार्यकर्ते  उपस्थित करीत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.