AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चुकीच्या नंदनवनात राहू नका’, अजित पवारांकडून आगामी निवडणुकांवर सूचक भाष्य

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सूचक भाष्य केलंय.

'चुकीच्या नंदनवनात राहू नका', अजित पवारांकडून आगामी निवडणुकांवर सूचक भाष्य
| Updated on: Feb 20, 2021 | 8:12 PM
Share

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सूचक भाष्य केलंय. एकदा कोरोना झाला म्हणजे परत होणार नाही या नंदनवनात नांदू नका. कोरोना होऊन गेल्यावरही कोरोना होत असल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे काळजी घ्या, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांवर सरकार विचार करत आहे, असं म्हणत त्यांनी सूचक भाष्य केलं. ते बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत बोलत होते (Ajit Pawar comment on corona and upcoming local body election in Maharashtra).

अजित पवार म्हणाले, “कोरोनाचं संकट वाढलं तर पुन्हा काही बाबतीत आपल्या मनाला मुरड घालावी लागेल. व्यवसाय पण चालले पाहिजेत, पण त्यातून कोरोना पसरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. काहींनी लसीकरण घेतलंय. पण सध्या टीव्हीला लसीकरण घेतल्यानंतरही कोरोना झाल्याच्या बातम्या दिसत आहेत. ज्या डॉक्टरांनी, नर्सेसने कोरोना लसीकरण घेतलंय त्यांनाच कोरोना झाल्याचं समोर येतंय. अनेकांना वाटेल की एकदा कोरोना झाला, म्हणजे पुन्हा होणार नाही. परंतु, तुम्ही चुकीच्या नंदनवनात नांदत आहात. हे चुकीचं आहे.”

“कोरोना होऊन गेलेल्यांनाही दुसऱ्यांदा कोरोना झाल्याची उदाहरणं आहेत. काहींना तर तिसऱ्यांदा कोरोना झालाय. त्यामुळे मी निवांत झालो, माझं काही राहिलं नाही, मी आता कोरोना प्रुफच आहे असं समजण्याचं काही कारण नाही. बारामतीकरांनी या आजाराबद्दल गांभीर्य राखाव,” असं आवाहनही अजित पवारांनी केलं.

‘राज्य सरकारकडून आगामी काही निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या सूचना’

अजित पवार म्हणाले, “मागील काळात अनेक निवडणुकाही कोरोनामुळे लांबणीवर टाकल्या होत्या. नंतर निवडणुका झाल्या, मात्र आता वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा एकदा आगामी काही निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितलं आहे. ज्या निवडणुका लागल्यात त्या नाही, पण ज्या येऊ पाहतायेत त्यावर विचार करण्यात येत आहे. मागे आम्ही 31 मार्चपर्यंत सर्व निवडणुका प्रलंबित ठेवल्या होत्या. पण तो आदेश मागे घेण्यात आला होता. आता पुन्हा कोरोनाची स्थिती तयार झालीय. म्हणून त्याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल”

‘अनेकांना दोनदा-तिसऱ्यांदा कोरोना झाल्याचे प्रकार’

“अनेकांना लसीकरण करुनही कोरोना झाला. तर अनेकांना दोनवेळा कोरोना झाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळं कोरोनाबद्दल गांभीर्य राखणं आवश्यक आहे,” असंही अजित पवार यांनी सांगितलं. तसेच येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होणार आहेत त्याबद्दल परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असंही सूचक विधान अजित पवार यांनी केलं, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकांबाबत कधी कोणता निर्णय घेतील सांगता येत नाही : अजित पवार

गुन्हेगारांवर वचक ठेवा, चोऱ्या होऊ नये म्हणून गस्त वाढवा; अजित पवारांच्या पोलिसांना सूचना

अजित पवारांनी आठवण सांगितली, मुलीचे दोन मार्क वाढवल्याने मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता!

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar comment on corona and upcoming local body election in Maharashtra

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.