“राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष, त्यांना हिंदुत्वाचे कुठलेही विचार पटत नाहीत”; धर्मवीर प्रकरणावरून इतिहासाच्या अभ्यासकांवरच प्रश्नचिन्ह
अजित पवार यांना नेहमीच चर्चेत राहायचं असतं त्यामुळे त्यांनी आता छत्रपती संभाजीराजे यांच्यावर वादग्रस्त विधान केले असल्याची टीका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
पुणेः हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक असल्याचे मत विधिमंडळात व्यक्त केले होते. त्यावर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना शिंदे गटाचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थेट जिहादी म्हणत त्यांनी हा पक्ष हिंदुत्वविरोधी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
ज्या छत्रपती संभाजीराजे यांनी शेकडो वर्षे धर्मवीर म्हणून काम केले, म्हणूनच त्यांना धर्मवीर म्हणतात. धर्मासाठीच त्यांनी आहुती दिली आहे.
तरीही राष्ट्रवादी काँग्रेस हिंदुत्वविरोधी असल्याने त्या पक्षाला जिहादी पक्ष असल्याचा ठपका त्यांच्या ठेवला गेला आहे असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
त्यांनी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी म्हटलेल्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्रवादीला जिहादी म्हटले आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्या जुन्या वक्तव्याचीही उजळणी केली. यावेळी ते म्हणाले की, अजित पवार हे चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत.
त्यांनी मागे ज्या धरणासंदर्भात जे वक्तव्य केले होते, तसेच वक्तव्य त्यांनी केले आहे असंही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी पक्षाला आता नव्याने इतिहास शिकवा पाहिजे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणूनच ओळखले जाते. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांना आताच का ते धर्मवीर न वाटता स्वराज्यरक्षक वाटू लागले आहेत.
संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणून नाकारणारा अजूनपर्यंत कोण इतिहासकार, आणि संशोधक आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. 2029 पर्यंत भाजप आणि शिंदे गटाचीच सत्ता महाराष्ट्रात राहणार त्यामुळे 2029 पर्यंत संजय राऊत असंच बरळत राहणार असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना सिरियस घेण्याची गरज नाही असंही त्यांना म्हटले आहे.