Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर अजित पवार यांची पहिली पण सावध प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटावर अजित पवार यांची आज अखेर पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. पत्रकारांनी फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबद्दलचा अजित पवार यांना वारंवार प्रश्न विचारले. त्यावर पवारांनी फार सावध प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर अजित पवार यांची पहिली पण सावध प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 6:16 PM

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच्या 2019च्या पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठा गौप्यस्फोट केलेला. त्या गौप्यस्फोटाबद्दल अजित पवार गेल्या तीन दिवसांपासून काहीच बोलले नाही. विशेष म्हणजे आज प्रसारमाध्यमांनी त्यांना त्याबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्नदेखील केला. पण अजित पवार यांनी गाडी न थांबवता तिथून निघून जाणं पसंत केलं. पण त्यानंतर अखेर अजित पवार यांना चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यावेळी पत्रकारांनी फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबद्दलचा पहिलाच प्रश्न विचारला. पण त्यावर त्यांनी फार सावध प्रतिक्रिया दिली.

“पहाटेच्या शपथविधीबाबत बोलणार नाही. मला बाकिच्यांबद्दल बोलायचंच नाही. मी त्याबद्दल बोलणार नाही. विषय संपला. मला त्याबद्दल बोलायचंच नाही. तुम्ही दुसरे काही विषय असतील ते बोला. तुम्हाला कळत नाही. अजित पवार मागेच बोललेला आहे. तो त्याच्या मतावर ठाम राहणार. त्यामुळे तुम्ही पुन्हा उगळून काढलं तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांचा नेमका गौप्यस्फोट काय?

“ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया. राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला की चला ठिक आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली”,  असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.

पहाटेच्या शपथविधीच्यावेळी अजित पवार यांचं बंड होतं का? इथूनच सुरुवात होईल. मला असं वाटतं की, तुमच्याकडे अजित दादा येवून गेले आहेत. त्यांनी बऱ्याच प्रश्नांवर नो कमेंट्स केलंय. त्यामुळे काही करता का होईना त्यांनी माझ्यासोबत शपथविधी घेतली होती. त्यामुळे काही पथ्य मीसुद्धा पाळली पाहिजेत. त्यामुळे काही कमेंट त्यांना करुद्या. त्यानंतर उर्वरित कमेंट मी करतो, असा

अजित दादा आमच्याकडे आले होते किंवा त्यांनी माझ्याबद्दल शपथ घेतली होती ती फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती ही गोष्ट सांगावी लागेल. त्यामुळे त्यांच्याकडे ठरल्यानंतर काय स्ट्रॅटेजी बदलल्या, ते कसे तोंडघशी पडले हे ते सांगतील. त्यांनी नाही सांगितलं तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.