आता रस्त्यांसाठी जमीन गेली तर मोबदला कमी मिळणार! कारण सांगताना अजित पवारांनी गडकरींकडे बोट दाखवलं

महसूल विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, आता भूखंड धारकांना राज्य किंवा राषअट्रीय महामार्गांसाठी कृषी जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला मिळेल.

आता रस्त्यांसाठी जमीन गेली तर मोबदला कमी मिळणार! कारण सांगताना अजित पवारांनी गडकरींकडे बोट दाखवलं
अजित पवार यांनी नितीन गडकरीच यासाठी जबाबदार असल्याचं वक्तव्य केलंय.
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 3:15 PM

पुणेः राज्यातील महामार्गांसाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित झाल्यास त्यासाठी मिळणारा मोबदला घटवण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. शुक्रवारी यासंदर्भातला अधिकृत जीआर जारी करण्यात आला. रस्त्यांसाठी यापूर्वी दिल्या जाणाऱ्या मोबदल्यापेक्षा यापुढे निम्माच मोबदला मिळणार आहे. मात्र असा निर्णय राज्य सरकारने का घेतला, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. त्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे बोट दाखवलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रस्त्यांसाठी जमीन केली तर यापुढे नागरिकांना कमी मोबदला दिला जाईल. कारण याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच बोलले आहेत. राज्यात महामार्गांची कामं करायची असतील तर जमीनीचे भाव कमी करावे लागतील. इतर राज्यात जमिनीचे भाव कमी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातदेखील रस्त्यांसाठी जमीन अधिग्रहित केल्यास इतर राज्यांप्रमाणे कमी मोबदला मिळणार आहे.

काय आहे नेमका जीआर?

महसूल विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, आता भूखंड धारकांना राज्य किंवा राषअट्रीय महामार्गांसाठी कृषी जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला मिळेल. यापूर्वी अकृषी जमीन महामार्गासाठी अधिग्रहित झाल्यास मोबदला गुणक 2 दिला जात होता. तो आता कमी करून 1 करण्यात आला आहे. म्हणजेच मोबदला अर्धा होईल. इतकेच नव्हे तर सर्व प्रकारच्या भूखंडाचा मोबदला निश्चित करताना रेडीरेकनरचे दरसुद्धा 20 टक्के कमी करण्यात आले आहेत.

इतर बातम्या-

Digambar Durgade जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी तर Sunil Chandere उपाध्यक्षपदी निवड – Ajit Pawar

Bhujbal | अदानी-अंबानींकडे सबसिडी मिळणार नाही, भुजबळांची तुफान टोलेबाजी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.