अजित पवार इंदापूर दौऱ्यावर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून 101 किलोंचा तिरंगा हार

इंदापूरचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी पंढरीतील फूल व्यापाऱ्यांकडून हा हार मागवला आहे. (Ajit Pawar Tricolor Garland)

अजित पवार इंदापूर दौऱ्यावर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून 101 किलोंचा तिरंगा हार
अजित पवारांसाठी एकशे एक किलोंचा तिरंगा हार
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 11:11 AM

इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) इंदापूर दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तब्बल एकशे एक किलो वजनाचा तिरंगा हार त्यांना परिधान केला जाणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी हा विराट तिरंगा हार तयार करुन घेतला आहे. (Ajit Pawar Indapur Visit NCP Corporators make 101 kg Tricolor Garland)

नगरसेवक अनिकेत वाघ यांची तयारी

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूर दौऱ्यात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत अजितदादांना घालण्यासाठी एकशे एक किलो वजनाचा तिरंगा हार तयार करण्यात आला आहे. इंदापूरचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी पंढरीतील फूल व्यापाऱ्यांकडून हा हार मागवला आहे.

तिरंगा हाराचं वैशिष्ट्य काय?

या हाराचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या प्रसिद्ध फूल व्यापार्‍यांकडून हा हार तयार केलेला आहे. या हारात तुळशीचीही पाने आहेत. आमचा विठूराया आमच्या भेटीला येत असल्याने विठूरायाला ज्या पद्धतीने तुळशीचा हार घातला जातो, त्याच पद्धतीने अजितदादांचा यावेळी सत्कार आम्ही करत असल्याच्या भावना नगरसेवक अनिकेत वाघ यांनी व्यक्त केल्या.

अजित पवारांच्या सभेकडे इंदापूरचे लक्ष

विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार प्रथमच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर असलेल्या पहिल्या इंदापूर दौऱ्यात अजित पवार नेमके काय बोलतात याकडे तालुक्यासह राजकीय क्षेत्राचं लक्ष लागून राहिलेले आहे. अजित पवार इंदापूर मध्ये आल्यानंतर नेहमीच विरोधकांवर कडाडून टीका करत असतात. अजित पवारांची भाषाशैली व भाषण ऐकण्यासाठी तालुक्यातील हजारो नागरिक गर्दी करत असतात.

दत्ता भरणेंकडून इमारतीची पाहणी

इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा इंदापूर नूतन इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच या कार्यक्रमास इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले. दत्तात्रय भरणे यांनी यावेळी नूतन इमारतीच्या सर्व बाबी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदार यांना इमारतीच्या काही दुरुस्त्या व्यवस्थित करण्यासंदर्भात सूचना दिल्या. यानंतर इंदापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणामध्ये सदर कार्यक्रमाची सभा आयोजित करण्यात आली असून त्या ठिकाणाची पाहणी भरणे यांनी केली.

संबंधित बातम्या:

नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत,अजित पवारांचा भाजपला टोला

रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार

(Ajit Pawar Indapur Visit NCP Corporators make 101 kg Tricolor Garland)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.