निवडणुकीआधी अजित पवारांची बारामतीकरांना साद; म्हणाले, आता तुमच्या हातात…

Ajit Pawar Jansanman Yatra in Baramati : राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा सध्या सुरु आहे. आज ही यात्रा बारामतीत आहे. बारामतीत रोड शो केल्यानंतर आता अजित पवारांची सभा सुरु आहे. या सभेत अजित पवार बारामतीकरांना संबोधित करत आहेत. वाचा सविस्तर बातमी...

निवडणुकीआधी अजित पवारांची बारामतीकरांना साद; म्हणाले, आता तुमच्या हातात...
अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 3:11 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही यात्रा अजित पवारांच्या बारामती मतदारसंघात आहे. भर पावसात अजित पवारांची जन सन्मान यात्रा सुरु आहे. अजित पवारांनी बारामतीत रोड शो केला. तेव्हा अजित पवारांचे शेकडो समर्थक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी या रॅलीत सहभाही झाले होते. रॅलीनंतर बारामतीतल्या मिशन हायस्कूल मैदानावर अजित पवारांची जाहीर सभा होत आहे. सभास्थळावर लाडकी बहिणी योजनेची बॅनरबाजी करण्यात आली आहे. निवडणुकीआधी या सभेतून अजित पवारांनी बारामतीकरांना साद घातली आहे.

अजित पवारांची बारामतीत सभा

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अजित पवारांची बारामतीत सभा होत आहे. या सभेतून अजित पवारांनी बारामतीकरांना साद घातली आहे. आज आपल्याला मंत्रिमंडळात संधी मिळाली. म्हणून निर्णय घेता आला. बारामतीत आता बदल होत आहे. आज लय पवार घरी यायला लागलेत. कधी आले नाहीत, असं लोक म्हणतील पण आता हे पण पवार आणि ते पण पवार घरी यायला लागले आहेत. मात्र पुढे काय करायचं हे तुमच्या हातात आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्यातील 287 मतदारसंघ आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त विकासनिधी आपल्या बारामतीत दिला. मी लवकरच बारामतीची ब्ल्यू प्रिंट काढणार आहे. बारामतीत कॅन्सर हॉस्पिटल काढणार आहे. अनेक योजना आपल्याला राबवायच्या आहेत. लोकांची कामं करण्याची धमक असली पाहिजे. नेतृत्व तसं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

भ्रष्टाचाराचे आरोप कुणी करता कामा नये. पुन्हा महायुतीचे सरकार आले तर योजना कायम सुरु राहणार आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार आहे? आम्ही गरिबी भोगली आहे आहे. पुढचं लाईट बिल भरायचं नाही. मागच लाईट बिल मागायला आलेत तर मी बघतो…, असंही अजित पवार बारामतीच्या सभेत म्हणालेत.

महिला अत्याचारावर अजित पवार म्हणाले…

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीय. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. बारामती आता शिक्षणाचं हब झालं आहे. अनेकजण बाहेरून बारामतीत शिकायला येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे. बारामतीत आदरयुक्त दबदबा पोलिसांचा असला पाहिजे. आमच्या बारामतीतल्या मुलींची छेड काढली तर खपवून घेणार नाही. अजितदादांनी पोलिसांना टाईट केलं आहे. कुठल्या पक्षाचाही असो त्याच्यावर कारवाई करा, अशा सूचना अजित पवारांनी पोलिसांना दिल्या आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.