Ajit Pawar On Hospital Bill : हे बघ, माझं बिल मी दिलं, मंत्र्यांच्या ‘उपचार लुटी’वर अजित पवारांचा आवाज चढला
ज्या मंत्र्यांनी कोरोनाकाळात खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी बिले दाखवली, त्यांना विचारा. माझे बिल मी दिले, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे.
पुणे : ज्या मंत्र्यांनी कोरोनाकाळात खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी बिले दाखवली, त्यांना विचारा. माझे बिल मी दिले, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. राज्याचे मंत्री मात्र कोरोना झाल्यानंतर फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये उपचार घेत होते. हे सर्व मंत्री जनतेच्या पैशातूनच उपचार घेत होते. याविषयी अजित पवार यांना विचारले असता त्यांनी आपली बाजू मांडली. मी माझे बिल दिले. ज्यांनी अशाप्रकारे उपचाराच्या नावाखाली सरकारी बिले दिली, त्यांना विचारावे असे मत व्यक्त केले. कोरोनाच्या संसर्गामुळे (Corona) मुंबईसह (Mumbai) राज्यात अनेक ठिकाणी बेडचा तुटवडा झाला होता. अनकांना बेड मिळणे दुरापस्त झाले होते. लोकांमधून संताप व्यक्त केला जात होता. मात्र, त्याचवेळी राज्याचे मंत्री मात्र कोरोना झाल्याने फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये उपचार घेत होते. त्यावर मोठा वादंग उठला होता.
…अन् दादांचा आवाज वाढला
मी कोरोनावर उपचार घेत असताना माझा स्वत:चा पैसा खर्च केला. आता काही मंत्र्यांनी याचा गैरफायदा घेतला, यावर ते म्हणाले, की तरी सरकारी सवलत असली तरी तुम्ही त्यांना जाऊन विचारा, की मंत्री असताना स्वत:चा पैसा खर्च करण्याऐवजी सरकारचा पैसा का घेतला? असे ते म्हणाले.
काय प्रकरण?
कोरोना काळात आघाडी सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. दोन वर्षात या मंत्र्यांनी उपचार घेतल्याची बिलं राज्य सरकारला सादर केली आहे. या सर्व मंत्र्यांच्या उपचारापोटी शासनाने 1 कोटी 39 लाख 26 हजार 720 रुपये भरले आहेत. सरकारी नियमानुसारच हे बील भरण्यात आलं आहे. मात्र, ज्यावेळी जनता सरकारी रुग्णालयात उपचार घेत होती, तेव्हा मंत्री मात्र फाइव्ह स्टार हॉटेलात उपचार घेत होते. त्यामुळे मंत्र्यांचा सरकारी रुग्णालयांवर विश्वास नाहीये का? असा सवाल या निमित्ताने केला गेला. माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली होती.