सगळी धरणं भरलेत, नीट शेती करा; नायतर ह्याचं काय अन त्याचं काय, अनं मळ तंबाखू असं नको,अजित पवारांची टोलेबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करण्यात आला. अजित पवारांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं अजित पवारांनी साखरेचा दर, सहकार, कारखान्यांची स्थिती, पूरस्थिती पाण्याचा प्रश्न यावर भाष्य केलं.

सगळी धरणं भरलेत, नीट शेती करा; नायतर ह्याचं काय अन त्याचं काय, अनं मळ तंबाखू असं नको,अजित पवारांची टोलेबाजी
अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 10:56 AM

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करण्यात आला. अजित पवारांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं अजित पवारांनी साखरेचा दर, सहकार, कारखान्यांची स्थिती, पूरस्थिती पाण्याचा प्रश्न यावर भाष्य केलं. अजित पवारांनी यावेळी मागच्या सरकारनं 5 टीएमसी पाणी दुसरीकडं वळवलं, त्यामुळं आपली वाट लागली असती,असं म्हटलं. आमचं सरकार आल्यावर निर्णय बदलला, असं अजित पवार म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील निर्णयावर टीका केली. रसापासून इथेनॉल बनवण्याचा पर्याय किंवा अन्य पर्याय निवडूयात. सभासदांना अधिक पैसे मिळतील यावर भर द्यावा लागेल. यंदा साखरेचं उच्चांकी उत्पादन होण्याची शक्यता आहे. अनेक कारखान्यांनी आपली क्षमता वाढवलीय. जायकवाडी धरण भरलंय, उजनी 109 % भरलंय. मी रोज धरणांची स्थिती काय याची माहिती घेत असतो. सगळी धरणं भरलेली आहेत, आता फक्त तुम्ही नीट शेती करा. नायतर ह्याचं काय अन त्याचं काय, अन मळ तंबाखू, सगळे दिवस सारखे नसतात. शेतीकडे नीट लक्ष द्या, असं अजित पवार म्हणाले.

सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नसते

अजित पवारांनी बऱ्याच वर्षांनी माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगामाला आलो असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी विजयादशमी, दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. 2 नोव्हेंबर रोजी बारामतीत मुख्यमंत्री, शरद पवार आणि देशातील महत्वाचे लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. चढउतार येत असतात, सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नसते. सरकार असलं तर जमिनीवर पाय ठेवून चालायच ही आमची भूमिका आहे. अडचणी येतात, संकटं येतात अतिवृष्टी, पूर आला परवा 10 हजार कोटींचे पॅकेज दिलं. जेवढं नुकसान झालं त्याची भरपाई देता येत नाही याची खंत आहे. केंद्र सरकारची मदत मिळत नाही, असं देखील अजित पवार म्हणाले.

आज माळेगावला आल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सोमेश्वरच्या 90% सभासदांनी साथ दिली. सोमेश्वरच्या 152 गावातल्या सभासदांचे आभार मानतो. मी म्हणालो होतो मतांचं ओझं टाका. त्यांनीही इतकं ओझं टाकलं की मी पार आडवाच व्हायची वेळ आलीय. 90 पासून राजकारणात आहे. एवढी एकतर्फी निवडणूक पाहिली नाही. हे फक्त सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात होवू शकतं. 4 कोटी 80 लाख रुपये किमतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन प्रकल्पाची माळेगाव कारखान्याने उभारणी केली.सभासद हे कारखान्याचे मालक असतात. नविन मुलं शिकलीत त्यांची मदत घ्या. उसाला चांगला दर, कामगारांना योग्य पगार, तोडणी कामगारांना योग्य दर मिळत असताना कोणाला त्रास होण्याचं कारण नाही.

जोपर्यंत तुमचा पाठींबा

राष्ट्रवादीकडे माळेगावची सुत्रे येण्यापूर्वी प्रचंड नुकसान झालं होतं. अनेक ठिकाणी गळती झाली होती. मला जोपर्यंत तुमचा पाठिंबा आहे तोवर मी कशातही कमी पडणार नाही. विरोधकांच्या ताब्यात असताना माळेगाव कारखान्यात सतत बिघाड होत होते. साखरेचं उत्पादन खराब झालेलं होतं.

चेअरमन व्हायचं म्हणून काहीजण…

पुरुषोत्तम जगताप यांचं उपस्थितांच्या यादीत नाव होतं. यावरुन अजित पवार यांनी तालुकाध्यक्षांना कानपिचक्या दिल्या. जे आलेत त्यांची नावे द्या, नाहीतर लोक म्हणतील अजित पवार झोपेतचय. दत्तात्रय भरणे यांचा हजारो टन ऊस जातो. आपलं लै कमीय. अनेक कारखान्यांमध्ये कुटुंबात पदे दिली जातायत. चार चार पिढ्या त्या पदावर काम करण्याची परंपराच आहे. सहकारी कारखान्यात सभासदांचा अंकुश असलाच पाहिजे. कारखाने ही सभासदांच्या पूर्वजांची संपत्ती आहे.

माळेगाव साखर कारखान्याबद्दल मध्यंतरी मी म्हणालो माळेगावला तावरे सोडून इतरांना संधी देणार आहे. मात्र, पण हे साहेब जेव्हा थांबा म्हणतील तेव्हा, असं अजित पवार म्हणाले. चेअरमन व्हायचं म्हणून काहीजण लगेच देवदर्शनाला गेले. पण बाळासाहेब तावरे काम करतायत तोवर करु द्या त्यांना असं अजित पवार म्हणाले. आम्ही दिलेल्या शब्दाचे पक्के आहोत जे काम करायचं ते पक्कंचं करणार आहे. यंदाचा गळीत हंगाम चांगला होईल. सभासदांनी पत्र दिलं, गेटकेन ऊस नको, आमचं पॅनल आलं की गेटकेन नको आणि विरोधकांची सत्ता असली की घाल गेटकेन, असं सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले.

पाण्याचा काटकसरीने वापर करा

धरणांची पाणी स्थिती चांगली असून पाण्याचा काटकसरीने वापर करा . उन्हाळ्यातही कमी पडू नये असं पाण्याचं नियोजन केलंय. मागच्या सरकारने पाच टीएमसी पाणी दुसरीकडे वळवलं होतं. आपल्या सगळ्यांची वाट लागली असती. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या पाण्याचं नियोजन केलंय. पाण्याचा शक्य तिथे काटकसरीने वापर आवश्यक आहे. ठिबकसह अन्य यंत्रणा वापरा. यावर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळ पडलाय. साखरेचे दर जागतिक बाजारपेठेत चांगले आहेत.

रसापासून इथेनॉल बनवण्याचा पर्याय किंवा अन्य पर्याय निवडूयात. सभासदांना अधिक पैसे मिळतील यावर भर द्यावा लागेल. यंदा साखरेचं उच्चांकी उत्पादन होण्याची शक्यता आहे. अनेक कारखान्यांनी आपली क्षमता वाढवलीय. जायकवाडी धरण भरलंय, उजनी १०९% भरलंय. मी रोज धरणांची स्थिती काय याची माहिती घेत असतो. सगळी धरणं भरलेली आहेत, आता फक्त तुम्ही नीट शेती करा. नायतर ह्याचं काय अन त्याचं काय, अन मळ तंबाखू, सगळे दिवस सारखे नसतात. शेतीकडे नीट लक्ष द्या, असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ज्या वर्षी ऊस जाईल त्या वर्षीच्या साखर उताऱ्यानुसार पैसे द्यायचे अशी चर्चा झालीय. यात काही संघटना, नेते यांच्यात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. गुजरातमध्ये तीन टप्प्यात पैसे दिल्यानं आपल्यापेक्षा जास्त भाव. त्यांना व्याज लागत नाही त्यामुळे त्यांना जादा दर देणे शक्य आहे, असं अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या:

Kirit Somaiya | अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी राहता येणार नाही, किरीट सोमय्यांचा पवारांवर हल्लाबोल

नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना 2-3 कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांचे तिरके बाण

Ajit Pawar said all dams are fill with water farmers gave attention to farming at Malegaon

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.