शिवजयंतीसाठी नियमावलीत शिथीलता मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार : अजित पवार
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील आढावा बैठक संपल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुणे: पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील आढावा बैठक संपल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जागतिक पातळीवर, देश पातळीवर आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी आहे. शिवजयंती (Shivjayanti) साजरी करण्यासाठी 7 दिवस शिल्लक आहे. यावर्षी शिवजंयती साजरी करण्यासाठी कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नियमावली जाहीर झाल्यानंतर ती विविध खात्यांना दिली जाईल, असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे आणि मला शिवनेरी किल्ल्यावरील जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
शिवनेरीवरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळं त्यांना शिवनेरीवरील कार्यक्रमात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जन्मसोहळ्यातील कार्यक्रमात आदित्य ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मी शिवेनरीवर उपस्थित राहणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
पाहा व्हिडीओ
पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जास्त
पुण्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात यायला लागली आहे. जागतिक पातळीवर होतंय तेच पुणे शहरात झाले आहे. राज्याचा बाधित दर हा 9 टक्के होता मात्र पुण्याचा 15 टक्के आहे . दुसरीकडे लसीकरणात 1 लाख 3 हजारांनी वाढ झाली आहे. मात्र अद्यापही 15 ते 18 वयोगटातील लसीकरण होण्यात अडचण येत आहे. याचे मुख्य कारण भारत बायोटेक कडून कोव्हँक्सिन तेवढा पुरवठा होत नाही. भारत बायोटेक कोव्हॅक्सिन तयार करते. पण तेवढा पुरवठा नाही. त्यामुळे शाळा सुरू असताना लसीकरणाचा कार्यक्रम घेता येत नाही. मुंबईत गेल्यावर वरिष्ठ पातळीवर बोलून पुणे आणि महाराष्ट्राला कोव्हॅक्सिनचा साठा देण्याची मागणी करू, असं अजित पवार म्हणाले.
मास्क वापरावा लागणार
थिएटरमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवून सुरू ठेवायला दिलं. इतर कार्यक्रमाला बंधनं आहेत. लग्न समारंभांना बंधन आहेत. सभागृहाची दोन हजार लोकांची कॅपेसिटी असेल तर एक हजार लोकांना परवानगी नाही. फक्त दोनशेलाच परवानगी आहे. त्यामुळे त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न राज्य स्तरावर चर्चा करून घेऊ. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. हळूहळू सर्व नियम हटवण्याची गरज आहे. जोपर्यंत कोरोना संपत नाही. तोपर्यंत सर्वांना मास्क वापरावेच लागेल.
इतर बातम्या :
IPL 2022 Auction: आयपीएल आणि जगातील अन्य टी 20 लीगमध्ये मिळणाऱ्या पैशातील फरक समजून घ्या…
Ajit Pawar said Uddhav Thackeray will take decision relief in restrictions for Shivjayanti celebration