25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या, राज्य मोदी सरकारकडे मागणी करणार

45 वर्षाखालील ज्यांना डायबिटीजसारख्या अन्य व्याधी आहेत, त्यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे. (Ajit Pawar Co Morbid Corona Vaccination)

25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या, राज्य मोदी सरकारकडे मागणी करणार
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 12:27 PM

बारामती : 25 वर्षावरील ज्यांना सहव्याधी (co-morbid) आहेत, अशा नागरिकांनाही कोरोना लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी लवकरच राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ते आज बारामतीत कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. (Ajit Pawar says CM Uddhav Thackeray to request PM Narendra Modi to allow Co Morbid Youth above 25 years Corona Vaccination)

कोव्हिड लस कोणाला द्यायची, हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकार घेत असतं. 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. तरी 45 वर्षाखालील ज्यांना डायबिटीजसारख्या अन्य व्याधी आहेत, त्यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे.

मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींना विनंती करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांना 25 वर्षावरील सहव्याधीग्रस्तांनाही लस उपलब्ध देण्याची विनंती करणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत दिली.

पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरणाची मागणी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी इच्छा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी व्यक्त केली होती. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली होती.

येत्या एक एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. 45 वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहन जावडेकरांनी केलं. आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती. (Ajit Pawar Co Morbid Corona Vaccination)

“मला फोटो काढण्याची नौटंकी आवडत नाही”

लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनेक नेते सोशल मीडियावर फोटो टाकतात. पण माझा फोटो टाकला तर जे लोक येणार आहेत, तेदेखली लस घेण्यासाठी फिरकणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मला लस घेताना फोटो काढण्याची नौटंकी आवडत नाही. इतर नेते कदाचित लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लस घेतानाचे आपले फोटो शेअर करत असतील. पण मी लस घेतानाचा माझा फोटो टाकला तर लोक अजिबात लसीकरणासाठी फिरकणार नाही, असे अजित पवार म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या, अजितदादांची मोदी सरकारकडे मागणी

माझा फोटो दिसला तर लोक लस घ्यायला येणार नाहीत: अजित पवार

(Ajit Pawar says CM Uddhav Thackeray to request PM Narendra Modi to allow Co Morbid Youth above 25 years Corona Vaccination)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.