AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : लोकांचा प्रतिसाद पाहून अजून काम करावं वाटतं, पहाटे 5 वाजता ही करायला तयार, पण अंधार असतो : अजित पवार

अजित पवार यांनी लोकांचा प्रतिसाद पाहिल्यावर आणखी काम करत राहावं, असं वाटतं. ज्यावेळी आम्ही आवाहन करतो त्यावेळी तुम्ही जो प्रतिसाद देता त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत की अजून काम केलं पाहिजे, असं म्हटलं.

Video : लोकांचा प्रतिसाद पाहून अजून काम करावं वाटतं, पहाटे 5 वाजता ही करायला तयार, पण अंधार असतो : अजित पवार
अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 7:50 AM

पुणे: बारामतीमध्ये पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अजित पवार यांनी लोकांचा प्रतिसाद पाहिल्यावर आणखी काम करत राहावं, असं वाटतं. ज्यावेळी आम्ही आवाहन करतो त्यावेळी तुम्ही जो प्रतिसाद देता त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत की अजून काम केलं पाहिजे. लवकर उठून सकाळी 6 वाजता केलं पाहिजे. अंधार असतो नाहीतर 5 वाजता पण केलं असतं. सकाळी लवकर उठून काम सुरु केल्यानं अधिकाऱ्यांची कुचंबना होते, असंही अजित पवार म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, जेवढी काय मदत करायची होती ती केली आहे, कोर्टात अहवाल गेला आहे, जो काही निर्णय येईल तो मान्य करावा लागेल, गरिबांच्या मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी एसटीची गरज आहे, आता कुठेतरी थांबलं पाहिजे, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी भावनिक आवाहन केलं आहे.

लोकांचा प्रतिसाद 6 वाजता उठून काम करावं वाटतं

आम्ही ज्यावेळी आवाहन करतो. त्यावेळी लोकांचा प्रतिसाद पाहून सकाळी 6 वाजता उठून काम केलं पाहिजे, असं वाटतं. त्याआधी 5 वाजताही उठलो असतो मात्र अंधार असतो,असं अजित पवार म्हणाले. मात्र, अधिकाऱ्यांची कुचंबना होते. बारामतीमधील पंचायत समितीच्या इमारतीसारखी दुसरी इमारत राज्यात असेल, असं वाटत नसल्याचं अजित पवार म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

बारामती एसटी बसस्थानाकाचे काम सुरू आहे ते राज्यातील पहिल्या पाच बसस्थानकात असणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, जेवढी काय मदत करायची होती ती केली आहे, कोर्टात अहवाल गेला आहे, जो काही निर्णय येईल तो मान्य करावा लागेल, गरिबांच्या मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी एसटीची गरज आहे, आता कुठेतरी थांबलं पाहिजे, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी भावनिक आवाहन केली आहे.

गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता टोला

काही जण निवडणुका जवळ आल्या की 50 वर्ष निवडून येतात, आणि पाण्याचं प्रश्न अजून मिटला नाही, असं म्हणत असतात. मात्र, निवडणुका गेल्या की कुठे गायब होतात तेच कळत नाही. मात्र, पाण्याचाही प्रश्न आता मिटवला आहे, त्यांच्याकडे आता मुद्दा ठेवला नाही. अजित पवार यांनी याद्वारे गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

इतर बातम्या:

सोमय्या-राऊत वादावर बोलणार नाही, मी लहान कार्यकर्ता, मुश्रीफांचा कुणाला टोला?

Ajit Pawar | अजितदादांनी ज्याला सुपारी घेऊन आलाय का विचारलं, तोच निघाला संभाजी छत्रपतींचा माजी पीए

पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.