वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर… शरद पवार यांच्यावर घरातूनच हल्ला; अजितदादा काय म्हणाले?

तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात. तुम्हाला आता थोडी कठोर भूमिका घ्यावी लागेल. इकडे पण तिकडे पण असं चालणार नाही. ज्याला माझ्याबरोबर राहायचं आहे, त्याने माझ्याबरोबर राहा. ज्यांना तिकडे जायचं आहे तिकडे जा तिकडं खुशाल जा. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. मीच कामे करू शकतो माझ्याशिवाय कोणीच कामे करू शकत नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर... शरद पवार यांच्यावर घरातूनच हल्ला; अजितदादा काय म्हणाले?
ajit pawar and sharad pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 5:14 PM

अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 24 डिसेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काहींनी तर वेगळ व्हायचा निर्णय 38 व्या वर्षी घेतला. वसंतदादा पाटलांना बाजूला केलं गेलं. वसंतदादा चांगलं नेतृत्व होतं. त्यांनाही बाजूला केलं गेलं, अशी खोचक टीका करतानाच मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आधी घेतला. त्यामुळे तुम्ही मला समजून घेतलं पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

बारामतीमध्ये अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या प्रसंगी अजित पवार यांनी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांना, तुम्ही आता काम करू नका. आराम करा. तुमचा अनुभव आम्हाला द्या, असं सांगत असतो. मला आता संपूर्ण राज्यात फिरावं लागेल. तुम्ही साथ द्या. तुम्ही देखील काम करा, असं अजित पवार म्हणाले.

इतरांचं ऐकू नका

53 पैकी 43 आमदार माझ्यासोबत आले. मी घेतलेला निर्णय योग्य म्हणूनच ही लोक माझ्यासोबत आली ना? अनेक वरिष्ठ नेते आपल्या सोबत आहेत. थोडासा दम धरा. इथून पुढे फक्त माझं ऐका. बाकी कुणाचं ऐकू नका. आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकलं. आता माझं ऐका. मी तुम्हाला असं काही करून दाखवतो की तुम्ही पाहातच राहाल, असं अजितदादा यांनी सांगितलं.

तुमच्या हिताचे निर्णय घेऊ

माझ्या भूमिकेवर आज पण मोठी चर्चा होते. पण मी तुम्हाला शब्द देतो मी जे काही करेन जो काही निर्णय घेईल तो तुमच्या हिताचा आहे. मी उपमुख्यमंत्री झाल्यापासून अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांच्याशी चर्चाही केली, असंही ते म्हणाले.

सत्तेत नसतो तर कामे…

जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी कामाला कुठेही कमी पडणार नाही. मी माझं चोख काम करेन. कुणालाही काही कमी पडणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सत्तेत असू तर आपण कामे करू शकतो. तुमच्या आशीर्वादाने आज मी राज्यात सत्तेत आहे. जर मी आज सत्तेत नसतो तर कामे करायला जमलं असत का? मला तुम्हीची सांगा. मला कुणावर टीका करायची इच्छा नाही. सर्वजण आपापल्या पद्धतीने काम करत असतात, असंही त्यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.