AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Lal Mahal : अखिल भारतीय मराठा महासंघानं केलं पुण्यातल्या लाल महालाचं शुद्धीकरण, गाण्याच्या शूटनंतर व्यक्त केला होता संताप

लाल महालातील गाण्याच्या शूट आणि रील्सचा विरोध संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला होता. लाल महालाच्या पायऱ्यांवर बसून जय जिजाऊ, जय शिवराय, संभाजी राजांचा जयजयकार अशा घोषणा आंदोलकांनी केल्या. त्यानंतर आज मराठा महासंघातर्फे लाल महालाचे शुद्धीकरणही करण्यात आले आहे.

Pune Lal Mahal : अखिल भारतीय मराठा महासंघानं केलं पुण्यातल्या लाल महालाचं शुद्धीकरण, गाण्याच्या शूटनंतर व्यक्त केला होता संताप
लाल महालाचे शुद्धीकरण करताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्तेImage Credit source: tv9
| Updated on: May 21, 2022 | 11:32 AM
Share

पुणे : पुण्यातील लाल महालात अखिल भारतीय मराठा महासंघाकडून (Maratha Mahasangh) शुद्धीकरण करण्यात आले आहे. ज्याठिकाणी गाण्याचे शूटिंग झाले, त्या संपूर्ण परिसराचे शुद्धीकरण अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आले आहे. माँ जिजाऊंच्या पुतळ्याला यावेळी दुग्धाभिषेक घालून अन् शूट झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण (Lal Mahal purification) करण्यात आले. लाल महाल याठिकाणी गाण्याचे शूटिंग करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. लावणीच्या स्वरुपातील हे रील्स समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध पुरोगामी संघटनांनी याचा निषेध नोंदवला होता. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा महासंघ यासह राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही आक्रमक होत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

घोषणा देऊन केला निषेध

लाल महालातील गाण्याच्या शूट आणि रील्सचा विरोध संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला होता. लाल महालाच्या पायऱ्यांवर बसून जय जिजाऊ, जय शिवराय, संभाजी राजांचा जयजयकार अशा घोषणा आंदोलकांनी केल्या. त्यानंतर आज मराठा महासंघातर्फे लाल महालाचे शुद्धीकरणही करण्यात आले आहे. याठिकाणी गाण्याचे शूट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून शिक्षा करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने काल केली होती. लाल महाल पर्यटकांसाठी आहे, की रील्स बनवण्यासाठी असा संतप्त सवाल काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला होता. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी काल केली होती.

हीच ती लावणी, ज्यावरून झाला वादंग

दाखल झाला गुन्हा

लालमहालात विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सुरक्षारक्षकाला हाताशी धरून याठिकाणी गाण्याचे शूटिंग करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर विविध संघटनांतर्फे निषेध नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी वैष्णवी पाटीलसह कुलदीप बापट, केदार अवसरे यांच्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.