संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बसने पंढरपूरला न्या, आळंदी ग्रामस्थांची देवस्थानकडे मागणी
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील (Alandi) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Pandharpur)बसने नेण्याची पंढरपूरला न्यावा, अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी देवस्थानकडे केली आहे. तर, ग्रामस्थांनी पायी वारीला आक्षेप व्यक्त केला आहे. कोरोना महामारीमध्ये जीवितहानी झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात मागील वर्षी प्रमाणे शासनाचे नियम पाळून महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या लालपरी बसने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचं […]
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील (Alandi) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Pandharpur)बसने नेण्याची पंढरपूरला न्यावा, अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी देवस्थानकडे केली आहे. तर, ग्रामस्थांनी पायी वारीला आक्षेप व्यक्त केला आहे. कोरोना महामारीमध्ये जीवितहानी झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात मागील वर्षी प्रमाणे शासनाचे नियम पाळून महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या लालपरी बसने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचं प्रस्थान करण्याची मागणी आळंदीकरांनी पत्राद्वारे जिल्हा प्रशासन, आळंदी देवस्थानकडे केली. (Alandi villagers demanded ashadhi palkhi sohala may organize with ST Bus like previous year )
पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांचा विरोध
पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. यंदाही पालखी सोहळा हा एसटीतूनच पंढरपूर जावा, अशी मागणी राज्य सरकार, आळंदी देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे.
तिसऱ्या लाटेला जबाबदार ठरायला नको
कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट परदेशातून आली, पण तिसऱ्या लाटेला आपण जबाबदार ठरायला नको. कुंभमेळा, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक, ग्रामपंचायत निवडणुकांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. तेव्हा पायी वारीचा अट्टाहास वारकरी संप्रदायाची अवहेलना आणि बदनामीला कारणीभूत ठरेल, असं ग्रामस्थांनी निवेदनात म्हटलंय.
वाखरी गामस्थांचीही पालखी सोहळा एसटीतून आणण्याची मागणी
पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामस्थांनी यंदाची आषाढी वारी प्रतिकात्मक पद्धतीनं करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षी एसटीतून पालखी सोहळा संपन्न झाला होता. त्याप्रमाणं यंदा देखील पालख्या एसटीतून आणाव्यात, अशी मागणी वाखरी ग्रामस्थांनी केली आहे. वाखरी ग्रामपंचायतीच्यावतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालखी सोहळ्याची प्रमुख संस्थानं यांना पत्र लिहिण्यात आलं आहे आहे.
पालखी मार्गावर वाखरी महत्वाचं गाव
पंढरपूरच्या आषाढी वारीच्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण आणि पालखी सोहळ्यातिल शेवटचे गोल रिंगण वाखरीमध्ये होते. वाखरी ग्रामपंचायतीने यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रतिकात्मक पद्धतींनं स्वरूपात साजरा करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे लेखी पत्र आळंदी संस्थानला पाठवण्यात आले आहे, असं गावच्या सरपंच कविता पोरे यांनी सांगितलं आहे. जर का पायी वारीला परवानगी दिली तर वाखरी गाव बंद ठेवू असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय.
अतिवृष्टीचा इशारा, कर्जत-खालापूरमधील धबधबे, धरण आणि तलवापरिसरात जाण्यास बंदी!https://t.co/1mNiikt6GA#raigad | #karjat | #raininmaharashtra | #rain
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 10, 2021
संबंधित बातम्या:
यंदाही गतवर्षीसारखा पालखी सोहळा एसटीतून आणा, अन्यथा गाव बंद ठेवणार, वाखरी ग्रामस्थांचा इशारा
आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकऱ्यांची अजित पवारांसोबत चर्चा, नेमकं काय ठरलं?
Alandi villagers demanded ashadhi palkhi sohala may organize with ST Bus like previous year