31 मार्चला उरले काही दिवस, आधी ही कामे करुनच घ्या

आर्थिक वर्ष संपण्यास आता काही दिवस राहिले आहे. आर्थिक वर्षाची कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्च रोजी बँका सुरु राहणार आहेत. सरकारी पातळीवर धावपळ असली तरी सर्वसामान्यांनाही आपली अशी कामे आहेत, जी पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा दंड होणार आहे.

31 मार्चला उरले काही दिवस, आधी ही कामे करुनच घ्या
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 9:45 AM

पुणे : आर्थिक वर्ष संपण्यास आता काही दिवसच उरले आहेत. यामुळे सरकारी पातळीवर धावपळ सुरु आहे. विविध विभागांना दिलेले बजेट खर्च करण्याचा प्रयत्न त्या-त्या विभागाकडून सुरु आहे. त्याचवेळी बँकांमध्ये आपली आर्थिक वर्षाची कामे पूर्ण करण्याची लगबग सुरु आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्च रोजी बँका सुरु राहणार आहेत. परंतु सर्वसामान्यांनाही आपली अशी कामे आहेत, जी पूर्ण करावी लागणार आहे. 31 मार्चपूर्वी ही कामे पूर्ण केल्यास तुमचा तोटा होऊ शकतो. कोणती कामे 31 मार्चपूर्वी करावी, जाणून घेऊ या.

कोणती आहेत कामे  

तुमचे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF) व सुकन्या समृद्धि योजना (SSY) खाते असेल अन् त्यात या आर्थिक वर्षात काहीच भरणा केला नसेल तर आता करुन घ्या. कारण तुमचे हे खाते सक्रीय ठेवण्यासाठी दरवर्षी त्यात भरणा करणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे खाते सक्रीय राहणार नाही आणि तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF)

PPF खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षांत कमीत कमी 500 रुपये टाकले गेले पाहिजे. जर तुम्ही ही रक्कम भरली नाही तर तुमचे खात सक्रीय राहणार नाही. यावर्षी 31 मार्च 2023 पर्यंत तुम्हाला हे काम पूर्ण करावे लागणार आहे. या खात्यात तुम्हाला 7.1% टक्का व्याज मिळते.

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

सुकन्या समृद्धी योजनेत तुमचे खाते असेल तर त्यात दरवर्षी 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. या खात्यावर तुम्हाला 7.6% व्याज मिळते. जर तुम्ही हे पैसे जमा केले नाही तर दंड लागणार आहे.

पॅन-आधार लिंक

आधार कार्ड-पॅन कार्ड जोडणीची अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. गेल्या वर्षीच केंद्र सरकारने याविषयीची घोषणा केली होती. सध्या 1000 रुपयांच्या दंडासह ही मुदत दिली आहे . आता 31 मार्चपर्यंत हे काम न केल्यास तुमचे पॅन कार्ड रद्द होण्याचा मोठा धोका आहे.

या ठिकाणी दिलासा

केंद्र सरकारने व्होटर आयडी आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख १ एप्रिल २०२३ होती. ती आता ३१ मार्च २०२४ करण्यात आली आहे. आधार कार्ड आणि व्होटर आयडी लिंक करणे आवश्यक आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.