Abdul Sattar | राज्यात पुढील 30 वर्षे शिंदे सरकार; काय म्हणाले मंत्री अब्दुल सत्तार

Abdul Sattar | राज्यात पुढील 30 वर्षे एकनाथ शिंदे यांचे सरकार राहील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाटते की 30 वर्षे सत्ता राहावी. पण जनता निर्णय घेते. ज्याचे जास्त खासदार त्याची सत्ता असते, असे वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. हवेची दिशा मी पाहत नाही,माणसं पाहून, पक्ष पाहून मी काम करतो, असे ते म्हणाले.

Abdul Sattar | राज्यात पुढील 30 वर्षे शिंदे सरकार; काय म्हणाले मंत्री अब्दुल सत्तार
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 2:06 PM

पुणे | 17 जानेवारी 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाटत असेल 30 वर्ष सत्ता राहावी,पण जनता निर्णय घेत असते. मला पण वाटतं एकनाथ शिंदे 30 वर्ष मुख्यमंत्री राहतील. ज्याचे जास्त खासदार त्याची सत्ता असते. जनता आमच्यासोबत आहे, असा दावा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. हवेची दिशा मी पाहत नाही, माणसं पाहून, पक्ष पाहून मी काम करतो, असे ते म्हणाले. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आजची पुण्यातील हवा थंडगार आहे अशी मिश्किल टिप्पणी पण त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या आरोपात नाही तथ्य

काल उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कादायक दावे केले. तसेच एकतर्फी निर्णय दिल्याचा आरोप केला. त्यावर सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. युती का तोडली याचं उत्तर द्यावे ठाकरे यांनी द्यावे. आजही पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री, आम्ही दैवत मानतो. तर उद्धव ठाकरे संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ते आता सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. पण न्यायालय आम्हाला न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेवढा संख्याबळ आमच्याकडे होत तेवढंच संख्याबळ अजित दादा यांच्याकडे आहे.त्यामुळे आमच्या सारखाच निर्णय अजित पवार यांच्या बाबत लागेल असं त्यांना वाटतं.

हे सुद्धा वाचा

सदाभाऊंवर साधला निशाणा

कोणत्याही शेतकऱ्यांचा माल आपण मार्केटयार्ड मध्ये घेतो, माझ्या निर्णयावर सदाभाऊ खोत यांची लायन्स घेण्याची गरज नाही, असा निशाणा त्यांनी सधाभाऊंवर साधला. हातकणंगले लोकसभा शिवसेनेची आहे,तिथं आमचे खासदार धैर्यशील माने खासदार आहेत.त्यामुळे हातकणंगले जागा सदाभाऊ यांनी मागण्याचा संबंधच येत नाही, असा दावा त्यांनी केला.

आव्हाडांचा बोलविता धनी दुसराच

जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो. हात जोडून माझी विनंती आहे,अशी वक्तव्य करून राज्यातील वातावरण खराब करू नये, त्यांचा बोलविता धनी दुसरा कोणी तरी असू शकतो, असा टोला त्यांनी हाणला. महिला आमदारांची संख्या वाढली तर त्यासाठी नवीन विधानभवन बांधण्यात येईल, असे ते म्हणाले. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे. आपण त्यांच्या वक्तव्यावर बोलणे उचितं होणार नाही असे म्हणतं, त्यांनी पुढे बोलणे टाळले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.