मतदान प्रक्रिया पार पडताच अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, यंदा लीड…
Amol Kolhe on Shirur Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा चौथा टप्पा पार पडला. शिरूरमधील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी अमोल कोल्हे यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर....
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया देशभरात पार पडते आहे. आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. शिरूर मतदारसंघासाठीदेखील मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी विरोधकांवरही अमोल कोल्हे यांनी टीका केली. तसंच किती लीड मिळणार? यावरही कोल्हे यांनी मोठा दावा केला आहे.
अमोल कोल्हे यांनी काय म्हटलं?
अमोल कोल्हे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी कमीत कमी 2 लाखाच्या लिडने निवडून येणार हा विश्वास आहे. हे मायबाप जनतेचं प्रेम आहे, असं म्हटलं. सकाळपासून फिरण्यात गनिमी कावा कसा? कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. समोरून पैसे वाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदान कमी तरी 100 टक्के कोल्हेंना फायदा होणार, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
अजित पवारांनी मला आव्हान दिलं असलं तरी ते शिरूर लोकसभेत मतदान कुठं करणार आहेत? इथले 25 लाख मतदार मला खासदार करणार आहेत, असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केलाय. गोमातेची सेवा करून मतदानाच्या महत्वपूर्ण दिवसाची सुरुवात अमोल कोल्हेनी केली होती. आज दिवसभरात शिरूरमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली.
शिवाजीराव आढळराव पाटील काय म्हणाले?
तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही मतदान प्रक्रियेवर भाष्य केलंय. मी आतापर्यंत ज्या ज्या गावात गेलो 40 ते 45 मतदार केंद्रावर भेट दिली. सगळ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. प्रत्येक बुथमध्ये सकारात्मक वातावरण आहे. सर्व विधानसभेत उत्साहाचं वातावरण दिसतंय, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.
कोल्हेंवर निशाणा
अमोल कोल्हे यांचेच पोलिंग एजंट मतदान करतात. तीन दिवसापूर्वी अंतर्गत चक्रातून माहिती मिळाली ती आतून नाटकबाजी करतील. शासनाची यंत्रणा पूर्णपणे दक्ष आहे. यंत्रणा पूर्णपणे दक्ष होऊन काम करत आहे. अमोल कोल्हेंनी मनापासून पराभव स्विकारला आहे, असा घणाघात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.