8 लाखांची लाच घेणारा IAS अनिल रामोड म्हणतो, आजपर्यंत कोणतेही कलंक नाही…

CBI raids IAS Anil Ramod : पुणे येथे आयएएस अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड सध्या कारागृहात आहे. त्याने जामिनीसाठी अर्ज केला आहे. अर्जात म्हटले आहे की, आजपर्यंत कोणतेही कलंक नाही...

8 लाखांची लाच घेणारा IAS अनिल रामोड म्हणतो, आजपर्यंत कोणतेही कलंक नाही...
anil ramod cbi raid
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 10:04 AM

पुणे : अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्याकडे सीबीआयने ९ जून रोजी छापा टाकला होता. या छाप्यात 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. विभागीय आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणेने छापा टाकला अन् बड्या अधिकाऱ्याला अटक केली. 13 जून रोजी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यामुळे अनिल रामोड याने जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावरील सुनावणी शुक्रवारी 16 जून रोजी होणार आहे. रामोड सीबीआय कोठडीनंतर आता येरवडा कारागृहात आहे.

काय म्हटले आहे जामीन अर्जात

सीबीआयने टाकलेल्या छाप्यात अनिल रामोड यांच्या घरातून 6 कोटी 64 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर कार्यालयातून 1 कोटी 28 लाखांची रोकड मिळाली होती. सीबीआयने केलेल्या प्राथमिक तपासात रामोड आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची तब्बल 17 बँक खाती आहे. या खात्यांमध्ये 47 लाख रुपये रक्कम आहे. आता जामिनीसाठी अर्ज करताना रामोड याच्या वकिलांनी काही दावे केले. त्यानुसार लाच प्रकरणात मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा नाही. यामध्ये केवळ 7 वर्षांपर्यंत शिक्षा आहे. तसेच सर्व रक्कम हस्तगत केली गेली आहे. त्यामुळे रिकव्हरीचा प्रश्न नाही.

तपास पूर्ण झाल्यामुळे छेडछाड अशक्य

अनिर रामोड याच्या आवाजाचा नमुनाही घेण्यात आला आहे. आता या प्रकरणी तपासात आणखी काही शिल्लक राहिले नाही. सीबीआयचा तपास पूर्ण झाला असल्याने कार्यालयात असलेल्या पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रश्न नाही, असा दावा त्याच्या वकिलांनी जामीन अर्जात केला आहे.

हे सुद्धा वाचा

आजपर्यंत कलंक नाही

अनिल रामोड गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत आहे. त्याच्यावर आजतागायत कोणताही कलंक नाही. तो चांगल्या कुटुंबातील व्यक्ती आहे. त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्तींचे पालनही करण्यास तो तयार आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी त्याचे वकील अ‍ॅड. सुधीर शहा आणि सचिन पाटील यांनी केली. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

कशी घेतली जात होती लाच

अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याचे लाच घेण्याचे एक सूत्र ठरले होते. भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच त्याच्याकडून घेतली जात होती. म्हणजेच भूसंपादनाचे मूल्य १ कोटी वाढवले तर १० लाख रुपये मला द्यावे लागतील, असे त्याच्याकडून सांगितले जात होते. सीबीआयने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.

हे ही वाचा

IAS अधिकारी अनिल रामोड एक कोटी मागे घेत होता 10 लाख, CBI तपासात धक्कादायक बाब उघड

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.