AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात तुफान पाऊस, प्रसिद्ध कार्ला लेणी बंद ठेवण्याचे पुरातत्व विभागाचे आदेश

पुरातत्व खात्याकडून पुणे जिल्ह्यातील कार्ला लेणी आणि परिसर पाऊस थांबत नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यात तुफान पाऊस, प्रसिद्ध कार्ला लेणी बंद ठेवण्याचे पुरातत्व विभागाचे आदेश
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 5:08 PM

पुणे : मागील दोन-तीन दिवसांपासून पुणे, मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यात तुफान पाऊस बरसतोय. काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पुरातत्व खात्याकडून पुणे जिल्ह्यातील कार्ला लेणी आणि परिसर पाऊस थांबत नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Archaeological Department orders closure of Karla Caves)

कार्ला येथील एकविरा देवी गडावर काल दरड कोसल्याची घटना घडली होती. त्यामुळे आज मावळ तहसीलदारांनी ज्या ठिकाणी दरड कोसळी तिथली पहाणी केली. त्यानंतर प्रशासनाकडून पर्यटकांनी कार्ला लेणी आणि परिसरात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात संततधार सुरुच राहणार

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसाची संततधार कायम राहणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज आणि उद्या सुद्धा पाऊस होईल. 24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, हवामान विभागानं आज रायगड, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला असून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नाशकात गोदावरीला दुसऱ्यांदा पूर; रामसेतू पुलाजवळ पाणी

नाशिकमध्ये (Nashik) गोदावरी (Godavari) नदीला यावर्षी बुधवारी (22 सप्टेंबर) दुसऱ्यांदा पूर (flood) आला आहे. रामसेतू पुलाजवळ पुराचे पाणी गेले असून, नदीकाठची सर्व मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत.सध्या गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्प्याने वाढविण्यात येत आहे. आज बुधवारी (22 सप्टेंबर) दुपारी एक वाजता हा विसर्ग 6000 क्युसेक्स केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. दुपारी तीनपासून हा विसर्ग वाढवण्यात आला असून, तो 8 हजार क्युसेकपर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला वर्षातला दुसरा पूर आला आहे.

दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी गेले आहे. रामसेतू पुलाच्या जवळ पाणी पोहचले आहे. नदीकाठची सर्व मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत. नागरिकांनी नदीत पोहायला जावू नये, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. नाशिककडे सुरुवातीला पाठ फिरवणाऱ्या पावसाने दुसऱ्या टप्प्यात जोरदार बॅटींग सुरू केली आहे. त्यामुळे नांदगाव, साकुरी या गावामध्ये दोनदा पूर आला आहे. यापूर्वी गोदावरीला एक पूर येऊन गेला आहे. सध्याही गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे.

मराठवाड्यातही दमदार हजेरी

औरंगाबाद शहरात दुपारपासूनच ढगांचा गडगडाट सुरु होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच पैठण, पाचोड, सिल्लोड, करमाड भागातही धुवांधार पाऊस सुरु झाला. मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोलीसह उस्मानाभाग जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

मराठवाड्यात यलो अलर्ट?

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. 22 सप्टेंबर रोजी बीड, परभणी, लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसण्याचे संकेत अर्थात यलो अलर्ट देण्यात आला आहे. ही माहिती डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.

इतर बातम्या

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाचा बनाव रचून तरुणीची 11 लाखांना फसवणूक, चेन्नईचा ‘लखोबा लोखंडे’ पुण्यात गजाआड

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान

(Archaeological Department orders closure of Karla Caves)

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.