AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली, पुण्यात रात्री उशिरापर्यंत तपास, तिघांवर गुन्हा दाखल

सैन्य भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी राज्यात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली असून पुणे पोलिसांनी या पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. (army recruitment paper leak pune exam)

सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली, पुण्यात रात्री उशिरापर्यंत तपास, तिघांवर गुन्हा दाखल
सांकेतिक फोटो
| Updated on: Mar 01, 2021 | 9:00 AM
Share

पुणे : सैन्य भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी राज्यात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली असून पुणे पोलिसांनी या पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन ठिकाणी समांतर कारवाई केली असून, विश्रांतवाडी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बारामती येथेून एकाला अटक करण्यात आलं आहे. अचानक पेपर फुटल्यामुळे देशभरात होणार सैन्य भरतीचा पेपर सरकारला रद्द करावा लागला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. (army recruitment paper leak in pune exam cancelled)

मिळालेल्या माहितीननुसार रविवारी म्हजेच 28 फेब्रुवारी रोजी देशभरात सैन्य भरतीसाठी परीक्षा होणार होती. मात्र, सैन्य भरतीचे पेपर आदल्या दिवशी फुटणार असल्याची खबर पोलिसांना लगली. त्यानंतर सापळा रचून गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. पुणे पोलिसांनी दोन टिकाणी समातंर पद्धतीने चौकशी केली. तसेच एकाला बारामती येथून ताब्यात घेतले. एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सेवानिवृत्त अधिकऱ्याच्या मुलाने याबाबत तक्रार दिली होती. पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एकूण 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.

नेमका प्रका काय?

देशभरात 28 फेब्रुवारी रोजी सैन्यभरतीसाठी परीक्षा होणार होती. मात्र, पेपर होण्याच्या आदल्या दिवशी पेपर फोडून ते उमेदवारांना पुरविणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी छापेमारी केली होती. तसेच, रात्र उशिरापर्यंत पोलिसांचा तपास सुरु होता. सध्या सैन्य भरतीसाठी देशभरात होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

नागपुरात आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ

दरम्यान, नागपूर येथे होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेतसुद्धा गोंधळ उडाला. प्रश्नपत्रिकेचे सील तुटलेले असल्यामुळे येथे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. तसेच येथे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता.  परीक्षा पेपरचे सील तुटलेले कसे?, असा सवालाही विद्यार्थ्यांनी येथील प्रशासनाला केला.

इतर बातम्या :

Maharashtra Board Exam and Result Date 2021 : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

(army recruitment paper leak in pune exam cancelled)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.