Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना पुणे कोर्टाकडून मोठा दिलासा

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पुणे कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मनोज जरांगे पाटील एकाबाजूला मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना ते कोर्टाच्या प्रकरणात अडकले आहेत.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना पुणे कोर्टाकडून मोठा दिलासा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 1:30 PM

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आज या प्रकरणी ते पुणे सत्र न्यायालयात हजर झाले. यावेळी पुणे कोर्टाने त्यांना दिलासा दिला. त्याचवेळी समज सुद्धा दिली. पुणे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांचं अटक वॉरंट रद्द केलं. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात प्रथम न्यायदंडाधिकारी ए.सी.बिराजदार यांनी हे अटक वॉरंट काढलं होतं. सरकारी वकिलांनी हे अटक वॉरंट रद्द करण्यास विरोध केला. कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांचं अटक वॉरंट रद्द केलं असलं, तरी त्यांना समज सुद्धा दिली आहे.

कोर्टाचा अवमान होईल अशा पद्धतीची वक्तव्य टाळावीत अशा समज आपणास देत आहोत असं कोर्टाने म्हटलं आहे. पुणे कोर्टाने, मनोज जरांगे पाटील यांना नव्याने बंद पत्र कोर्टाला द्यायला सांगितलं आहे. त्याशिवाय आजमीनपात्र अटक वारंट रद्द होणार नाही.

काय आहे फसवणुकीच प्रकरण?

मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप. कोर्टात हजर न राहिल्यामुळे जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी झालं होतं. 2013 मध्ये जालन्यात धनंजय घोरपडे यांच्या शंभूराजे नाटककाच्या 6 प्रयोगांचा आयोजन करण्यात आलं होतं. मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्ता बहीर यांनी हे आयोजन केलं होतं. प्रत्येक प्रयोगाला 5 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये देण्याच आयोजकांनी कबूल केल्याच घोरपडेंचा दावा आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.