Pune crime : एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला, मात्र आग लागून रोकड जळून खाक; पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतली घटना, चोरटा पसार

या प्रकारात मशीनला आग लागली. आगीत एटीएम मशीन, 3.98 लाख रुपयांची रोकड आणि आवारातील इतर वस्तू जळून खाक झाल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे. आम्ही एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे

Pune crime : एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला, मात्र आग लागून रोकड जळून खाक; पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतली घटना, चोरटा पसार
गोरेगावमध्ये एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले पैसे पळवलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 5:17 PM

पुणे : चोरीचा प्रयत्न करताना एटीएम मशीनला आग (ATM catches fire) लागून एटीएम मशीनमधील रोकड जळून खाक झाल्याचा प्रकार पुण्यात घडला. अज्ञात चोरट्याने कॅश डिस्पेन्सिंग मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग लागली. या आगीत एटीएम आणि त्यात ठेवलेली 3.98 लाख रुपयांची रोकड जळून खाक (Burnt) झाल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी परिसरात असलेल्या एटीएम सेंटरमध्ये रविवारी पहाटे ही घटना घडली. एटीएममध्ये अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. तेथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर (CCTV camera) काळ्या रंगाची फवारणी केली आणि त्यानंतर एटीएमची तिजोरी फोडण्यासाठी गॅस कटरसारखी वस्तू वापरण्याचा प्रयत्न केला, असे चिखली पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, असे प्रकार वारंवार होत असून याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

गुन्हा दाखल

या प्रकारात मशीनला आग लागली. आगीत एटीएम मशीन, 3.98 लाख रुपयांची रोकड आणि आवारातील इतर वस्तू जळून खाक झाल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे. आम्ही एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेची चौकशी सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

जिलेटिनने उडवले होते एटीएम

नुकतेच एटीएम मशीनला लक्ष्य करून चोरट्यांच्या टोळीने रोख रक्कम घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पिंपरी चिंचवडमध्ये जिलेटिन कांड्याचा वापर करून एटीएम चोरट्यांनी फोडले होते. 21 एप्रिलच्या पहाटे तीनच्या सुमारास चिखली परिसरातील कॅनरा बँकेचे एटीएम जिलेटिनच्या कांड्या लावून उडवण्यात आले होते. यात लाखो रुपये जळून खाक झाले होते. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एटीएम लुटण्याचा उद्देशाने हा ब्लास्ट घडवून आणला होता.

हे सुद्धा वाचा

वारंवार घडताहेत घटना

पुण्यात आणि इतर महत्त्वाच्या शहरांतदेखील एटीएममधील पैसे चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. पुण्यात लोखंडी गजाच्या सहाय्याने एटीएम तोडून रोकड चोरण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. एन. डी. ए. रोडवरील शिवणे येथील आयसीआयसीआय बँकच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला होता. तर पिंपरी चिंचवडच्या खराळवाडीजवळ एक एटीएम फोडलेल्या अवस्थेत नुकतेच दिसले होते तर दुसऱ्या एटीएममध्ये संशयित आढळले होते. त्यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तर एक पळून गेला होता.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.