Leopard in Chakan MIDC | चाकण वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु; कंपनी परिसरात पिंजरा लावला
चाकण एमआयडीसीतील मर्सिडीज बेंज कंपनीत बिबट्या घुसल्याचे -पहाटेच्या सुमारास कंपनीच्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
पुणे – जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या (Leopard) वावर वाढत आहे. एरवी उसाच्या शेतात, गावात बिबट्या आढळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एवढंच नव्हे तर आंबेगाव, जुन्नर परिसरात अनेकदा बिबट्याने नागरिकांवर हल्लेही केले आहेत. मात्र आज पिंपरीतील चाकण एमआयडीसीत (Chakan MIDC) बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. एमआय डीसीतील मर्सिडीज बेंज कंपनीत (Mercedes Benz) बिबट्या घुसल्याचे -पहाटेच्या सुमारास कंपनीच्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
कंपनीतील कामगारांना बाहेर काढले
घटनेची माहिती मिळताच कंपनीतील कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. पहाटेच्या सुमारास कंपनी च्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली.मात्र हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेलं नाही. बिबट्याला पकडण्यासाठी कंपनीत पिंजराही बसवण्यात आला आहे. वन सद्यस्थितीला बिबट्या मर्सिडीज बेंज कंपनीमधील बॉडी शॉप मध्ये असल्याची प्राथमिक माहितीमिळाली आहे.
नागरिकांवर हल्ल्याची प्रकरणे
यापूर्वी जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, जुन्नर याभागात बिबट्या शेतात तर कधी कोंबड्याच्या खुराडयात , विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. एवढं नव्हे तर पाळीव प्राण्यांना फस्त करण्याबरोबरच , लहानमुलांसह नागरिकांवरही हल्ले केले आहेत. याबरोबरच पुण्यातील कात्रज बोगद्या येथेही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. जिल्ह्यातील भौगोलिक वातावरण तसेच उसाच्या शेतीमुळे मागील काही वर्षात बिबट्याचा अधिवास वाढला आहे.
माणुसकी दुर्मिळ झाली, नाशिकच्या हॉस्पिटलने केवळ एका सहीसाठी अडवला पोलिसाचा मृतदेह!
Video : शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी घेतली गिरीश महाजनांची गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधान
Video : अमेरिकेतली नाही, महाबळेश्वरची वावटळ आहे ही! ढगात घुसणाऱ्या मातीचा भोवरा कॅमेऱ्यात कैद