Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown: आधी लॉकडाऊनला विरोध; आता बाळासाहेब थोरात म्हणतात…

राज्यात लॉकडाऊन करण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कडाडून विरोध केला होता. (balasaheb thorat hints three week lockdown in maharashtra)

Maharashtra Lockdown: आधी लॉकडाऊनला विरोध; आता बाळासाहेब थोरात म्हणतात...
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 11:38 AM

संगमनेर: राज्यात लॉकडाऊन करण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने थोरात बॅकफूटवर आले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी आणखी कडक निर्बंध राज्यात लागू करण्याबाबत सुतोवाच केलं आहे. त्यामुळे थोरातही तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनला अनुकूल असल्याचं बोललं जात आहे. (balasaheb thorat hints three week lockdown in maharashtra)

प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी हे संकेत दिले आहेत. ते संगमनेर येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. राज्यात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाची साखळी तोडून कोरोनाबळींची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. मृत्यूंची संख्या वाढते ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं थोरात यांनी सांगितलं.

मानवतेवरील संकट

लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचं अतोनात नुकसान होत आहे. ज्यांच्या हातावर पोट आहे, त्यांची अवस्था तर खूपच बिकट आहे. कोरोना हे जागतिक पातळीवरील संकट आहे. मानवतेवर आलेलं संकट आहे. त्यामुळे या संकटाला सर्वांना सामोरे जावं लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

विखे-पाटलांवर टीका

यावेळी त्यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. त्यांनी काय आरोप केले त्याला मी महत्त्व देत नाही. ते त्यांची आरोप करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनाचा संसर्ग केवळ एकट्या नगरमध्येच नाही तर सर्वत्र हीच परिस्थिती आहे. मृत्यूची संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येणार नाही. त्यामुळे काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्व पक्षीय बैठक

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. (balasaheb thorat hints three week lockdown in maharashtra)

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown : वाढते मृत्यू, लसींचा तुटवडा, मुख्यमंत्र्यांची आठवडाभरातच लॉकडाऊनबाबत दुसरी बैठक

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांनी बाह्या सरसावल्या, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांना पुन्हा बोलावलं, कडक लॉकडाऊनची शक्यता

Maharashtra Lockdown : ..तर भाजप संपूर्ण लॉकडाऊनचा सकारात्मक विचार करेल – प्रविण दरेकर

(balasaheb thorat hints three week lockdown in maharashtra)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.