पोलिसांच्या शिष्टाईला यश, बंडातात्या कराडकर यांच्याकडून पायी वारीचा निर्णय मागे
पायी वारी करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना समजावण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांनी पायी वारीचा निर्णय मागे घेतला आहे.
पुणे : पायी वारी करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना समजावण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांनी पायी वारीचा निर्णय मागे घेतला आहे. पोलिसांच्या शिष्टाईनंतर बंडातात्या कराडकर यांनी हा निर्णय घेतलाय. याबाबत पोलिसांनी माहिती दिलीय (Bandatatya Karadkar cancel his decision of participation in Ashadhi wari in Alandi).
दरम्यान, ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर शुक्रवारी (2 जुलै) सकाळी आळंदीतील वारीत दाखल झाले होते. तसेच यावेळी नियम डावलून पायवारीला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी बंडातात्या जिथे दिसतील तिथून त्यांना ताब्यात घ्या, असे आदेश दिले होते. त्यानंतरही बंडातात्या वारीत सहभागी झाले. सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असंही आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं. त्यामुळे काहीसा तणाव वाढला होता.
“वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच”
वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये वारी सोहळा पार पडणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांनी वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच, असे म्हटले होते.
हेही वाचा :
यंदाचा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळा कसा असेल?
संत तुकाराम महाराज पालखी 1 जुलैला देहूवरुन पंढरपूरकडे निघणार, वाचा 1 ते 19 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2 जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे निघणार, वाचा 2 ते 24 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम
व्हिडीओ पाहा :
Bandatatya Karadkar cancel his decision of participation in Ashadhi wari in Alandi