शिवसेना खासदारच्या मतदार संघात भाजपकडून भावी खासदार बॅनर, सेना उमेदवाराचे टेन्शन वाढले

pune maval lok sabha bjp candidate | पुणे जिल्ह्यात बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच होणार आहे. दोन्ही पक्ष ही निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्याचवेळी मावळमध्ये शिवसेनेच्या जागेवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे.

शिवसेना खासदारच्या मतदार संघात भाजपकडून भावी खासदार बॅनर, सेना उमेदवाराचे टेन्शन वाढले
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 11:20 AM

रणजित जाधव, मावळ, पुणे दि.25 डिसेंबर | पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रत्येक लोकसभा मतदार संघानिहाय रणनीती तयार केली जात आहे. युती आणि आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु झाली आहे. काही जागांवर आतापासूनच वाद निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यात बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच होणार आहे. दोन्ही पक्ष ही निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्याचवेळी मावळमध्ये शिवसेनेच्या जागेवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. भाजपचे बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर मावळमध्ये लागले आहेत.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे तयारीला

पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदार संघामध्ये आगामी लोकसभेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आगामी मावळ लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी जाहीरपणे आपली इच्छा बोलून देखील दाखवलेली आहे. त्यावेळी उर्से टोल नाका येथे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून फलक झळकले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनी देखील मावळ लोकसभेवर नुकताच दावा केला होता. त्यामुळे महायुतीत मावळ लोकसभेवरून वाद होण्याची चिन्ह आहेत.

हे सुद्धा वाचा

तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा दावा

शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मावळ लोकसभेवर दावा ठोकला आहे. मावळ लोकसभा उमेदवारी कोणाला मिळणार हे आगामी काळच ठरवेल. बाळा भेगडे यांच्या भावी खासदाराच्या फलकामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे मात्र टेन्शन वाढल आहे. पुणे जिल्ह्यातील चार पैकी दोन जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे. कारण पुणे जिल्हा भाजपसाठी महत्वाचा आहे. यामुळे राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी कोणाला भाजपच्या निर्णयाचा फटका बसले किंवा दोन्ही पक्ष एक, एक जागा लढवेल आणि भाजपला एक जागा मिळेल, हे आगामी काळात दिसणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.