Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीच्या सभेत अजितदादांचा शरद पवारांवर थेट निशाणा; म्हणाले, तुम्ही जर…

DCM Ajit Pawar on Sharad Pawar and Baramati Loksabha Election 2024 : बारामतीत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काका शरद पवारांवर घणाघात... शरद पवारांचं नाव घेत अजित पवारांनी थेट निशाणा साधला. अजित पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर....

बारामतीच्या सभेत अजितदादांचा शरद पवारांवर थेट निशाणा; म्हणाले, तुम्ही जर...
अजित पवार आणि शरद पवार यांचा फोटो
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 1:05 PM

कालची सभा अमिरेकेत झाली असं त्यांना वाटतंय. अमेरिका काही पत्रकार आले होते. पवारसाहेब यांच्या पायाशेजारी सुप्रिया सुळे बसली आणि एका बाजूला युगेंद्र, दुसऱ्या बाजूला रोहित होता… सर्व कुटुंब जवळ घेऊन बसलं होतं. अमेरिकेत जावं कुटुंब किती एक आहेत… सर्व संस्था साहेबांनी काढल्या, असं त्यांचं म्हणणं आहे. मग मी काय केलं? गप्प बसलो का? संस्था सर्व त्यांनी काढल्या परंतु जन्म झाला नव्हता, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. बारामतीतील काटेवाडी जवळच्या कन्हेरी गावातील मारुतीवर पवार कुटुंबियांची श्रद्धा आहे. त्यामुळे कन्हेरीतील मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. काल याच मंदिरात सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता. पवार कुटुंबाच्या परंपरेनुसार कन्हेरी मारुतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात होते. तसंच यंदाही प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

अजित पवारांचे गंभीर आरोप

आमचे चिरंजीव- युगेंद्र पवार सांगत होते सर्व साहेबांनी केलं. सर्व खोटं बोलत आहेत. परंतु साहेबांचे आशीर्वाद होते. धमक्या कोण देतोय आम्ही खाली मान ऐकतोय. धमक्या दिल्या तर एवढ्या मतांनी निवडून आलो असतो. शारदानगर शैक्षणिक संकुलात धमकी देऊन कामावरून काढलं जातंय, असा गंभीर आरोप अजित पवारांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीवर भाष्य

यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक सुनेची- लेकीची, नणंद-भावजय यांची नाही. तर ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. ही देशाची निवडणूक आहे. माझ्यावर आरोप केले तरी माझ्या अंगाला भोक पडत नाहीत. 1989 साली अजितला लोकसभा निवडणूक लढवा, असे काही जणांनी सांगितलं. मात्र साहेब म्हणाले अजितला दिल्लीला जाऊ द्या. मी जातो, काटेवाडीला शेती करायला… सुप्रियाच्या लग्नानंतर राजकारणात कोणी यायचे विचारलं गेलं. त्यावेळी सर्वांनी व्यवसायात लक्ष दिले. सर्वांनी धंदा पाणी सोडलंय आणि प्रचारात आलेत. आमचे थोरले बंधू आमच्या कार्यकर्ता यांच्याकडे जातात. लोकसभेला मतदान करा आणि विधानसभेला आम्ही नाही मत मागायला येणार असं सांगत आहेत. आमच्या कार्यकर्ता यांच्यात संभ्रम निर्माण केला जातोय, असंही अजित पवार म्हणाले.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.