12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का धरता?; राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले

12 सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांना सुनावले. 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही. (bhagatsingh koshyari)

12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का धरता?; राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
bhagatsingh koshyari
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 2:37 PM

पुणे: 12 सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांना सुनावले. 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला सुनावले. (bhagat singh koshyari first time reaction on 12 mlcs nomination)

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रणपिसे यांनी राज्यपालांची भेट घेऊन 12 सदस्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली. या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा, असंही ते म्हणाले. त्यावर राज्यपालांनी रणपिसे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता?, असा सवाल राज्यपालांनी केला. या विषयावर राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे, असं त्यांनी रणपिसेंना सांगितलं.

आज बोलणं योग्य नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो. त्यावेळी या 12 सदस्यांच्या नियुक्तीचा विषय काढला होता. तसेच हे प्रकरण कोर्टातही गेलं. त्यावर कोर्टाने सूचक विधान केलं आहे, असं सांगतानाच आज त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. आज स्वातंत्र्य दिन आहे. या विषयावर नंतर बोलेन, असं अजित पवार म्हणाले.

आघाडीत समन्वय नाही

तर, आज स्वातंत्र्य दिन आहे. कोणताही राजकयी विषय नाही. मात्र, काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांकडे 12 सदस्यांच्या नियुक्तीचा विषय काढला. त्यावर काँग्रेसचे नेते म्हणून तुम्ही मागणी करत आहात. पण तुमचे नेते काहीच पाठपुरावा करत नाहीत, असं राज्यपालांनी त्यांना सांगितलं. यावरून तुम्हीच काय ते समजून घ्या. काँग्रेस नेते आणि इतरांमध्ये समन्वय नसल्याचं यातून दिसून येतं, असंही ते म्हणाले. (bhagat singh koshyari first time reaction on 12 mlcs nomination)

संबंधित बातम्या:

…तर नाईलाजाने आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्र्याचा जनतेला स्वातंत्र्यदिनी पुन्हा इशारा

तिसरी लाट भयंकर असणार, काळजी घ्या, महाविकास आघाडी तुमच्यासोबत: राऊत

Mumbai Local | मुंबईकरांना लोकल’स्वातंत्र्य’, लसवंत प्रवाशांसाठी मुंबईची लाईफलाईन पुन्हा खुली

(bhagat singh koshyari first time reaction on 12 mlcs nomination)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.