‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा देणार, अजित पवारांची घोषणा

'भारत बायोटेक'च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे

‘भारत बायोटेक'च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा देणार, अजित पवारांची घोषणा
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 7:01 PM

मुंबई : कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तिनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर औषधांचा पुरवठा सुरळीत रहावा. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. लसउत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. (Bharat Biotech’s plant to be set up in Pune, says Deputy CM Ajit Pawar)

दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते. उदघाटन कार्यक्रमाला आमदार राहूल कुल, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, यवतचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर उपस्थित होते.

‘भारत बायोटेक कंपनीचा प्लॅन्ट पुण्यात उभारला जाणार’

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. भारत बायोटेक कंपनीच्या प्लॅन्टला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन सुरु आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल.

नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचं आवाहन

दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने देऊळगाव गाडा येथे विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटर सुरु केल्याने या परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोरोनाविरोधी लढ्यात राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण मदत, सहकार्य मिळत असल्याबद्दल आमदार राहूल कुल यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला दौंड तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व्हीसीद्वारे पध्दतीने उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

म्युकोरमायकोसिसचा धोका वाढला, ठाकरे सरकार सावध; हाफकिनला दिली 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर

सर्वात मोठी गुड न्यूज, मुंबईजवळच्या ‘या’ शहरातील कोरोनाची लाट ओसरली?

Bharat Biotech’s plant to be set up in Pune, says Deputy CM Ajit Pawar

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.