AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिगवणमध्ये 150 किलो गांजा जप्त, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली

भिगवणमध्ये 150 किलो गांजा जप्त, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
| Updated on: Nov 07, 2020 | 6:37 PM
Share

बारामती : इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. दीडशे किलो गांजा जप्त करत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तसंच 24 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला. पुणे ग्रामीण पोलिसांचं हे मोठं यश मानलं जातंय. (bhigwan hemp Seized Cost of 24 Lakh By Pune Rural Police)

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपीस भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे 24 लाख 10 हजार 500 रुपये किमतीचा 150 किलो गांजा तसेच एक चारचाकी कार (किंमत रुपये 4 लाख) असा एकूण 28 लाख 10 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्याकडून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. याच आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते. या पथकाने गेल्या काही दिवसांपूर्वी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून उरुळी कांचन येथे 2 सराईताकडून 28 किलो वजनाचा गांजा तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण 8 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट तसेच पीएसआय शिवाजी ननवरे, तसंच पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

(bhigwan hemp Seized Cost of 24 Lakh By Pune Rural Police)

संबंधित बातम्या

सांगलीत 52 लाखांचा गांजा जप्त, जत पोलिसांची मोठी कारवाई

कांद्याखालून दारु तस्करी, 12 हजार दारुच्या बाटल्यांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त, हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.