मविआतील बड्या नेत्याच्या टीकेला अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले, सोम्या गोम्याच्या…
Ajit Pawar : महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात आहेत का?; राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. महाविकास आघाडीतील बड्ा नेत्याने अजित पवार यांना सल्ला दिला होता. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलंय. अजित पवार नेमकं काय म्हणाले? वाचा...
योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोरेगाव भीमा- पुणे | 01 जानेवारी 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एखाद्याने टीका केली तरी त्याला हटके शैलीत अजित पवार उत्तर देतात. महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजितराव हवा बहुत जोर से बेह रही है… टोपी उड जायेगी!, अशी टीका संजय राऊत यांनी पुण्यामध्ये बोलताना केली होती. त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिलंय. अजित पवार भीमा कोरेगावमध्ये बोलत होते.
अजित पवार यांचं विजयस्तंभाला अभिवादन
कोरेगाव भीमा इथं आज विजयस्तंभ 206 वा अभिवादन दिन साजरा केला जात आहे. त्यासाठी विजयस्तंभाला अभिवादन दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही विजयस्तंभाला अभिवादन केलं. दरवर्षीप्रमाणे अभिवादन केलं. मोठ्या संख्येने जनसमुदाय येत असतो. चांगल्या सुविधा कोरेगाव भीमा इथं देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. शासनाच्या प्रत्येक विभागाने आपल्या घरच्या सारखे काम केलं आहे. कोरेगाव भीमा इथं येणाऱ्या सर्व अनुयायांनी शांततेत अभिवादन करावं. शांतते शौर्यस्तंभास अभिवादन करावं. हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाने संपुर्ण तयारी केली आहे, असं अजित पवार म्हणाले.
उद्योग राज्याबाहेर जातायेत?
महाराष्ट्रातील अनेक उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.विरोधकांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय. राज्यातून काही उद्योग उद्योग बाहेर गेलेले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर काही मुद्दे नाहीत. म्हणून हे असे मुद्दे काढण्यात येत आहे. कालच मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकलं. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही, असं अजित पवार म्हणालेत.
डीपीडीसी निधी वाटपावर अजितदादांची प्रतिक्रिया
डीपीडीसीच्या निधी वाटपावरून भाजपच्या डीपीडीसी सदस्यांनी लेखी नाराजी व्यक्त केली होती. तसं पत्र विभागीय आयुक्तांना दिलं होतं त्यावर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी डीपीडीसीच्या निधी वाटपाचा चेंडू भाजपच्यात कोर्टात टोलावला आहे. सोलापूर जिल्ह्यात डीपीडीसीच्या निधी वाटपाचं सूत्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठरवलं आहे . त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात देखील निधीचं वाटप करण्यात आलं आहे. त्याविषयी कोणाचं काही म्हणणे असेल तर मला माहिती नाही, असं अजित पवार म्हणालेत.