Trupti Desai : ‘एकविसाव्या शतकात संकुचित विचार करत बसलो, तर कुटुंब नियोजनाच्या गप्पा हवेतच राहतील’
कुटुंब नियोजनाच्या कीटचे भूमाता ब्रिगेड (Bhumata Brigade) संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. आशा वर्कर्स पुढे व्हा आणि कुटुंबनियोजनाच्या कामाला लागा, असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
पुणे : कुटुंब नियोजनाच्या कीटचे भूमाता ब्रिगेड (Bhumata Brigade) संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. आशा वर्कर्स पुढे व्हा आणि कुटुंबनियोजनाच्या कामाला लागा, असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई (Trupti Desai) म्हणाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने (Government of Maharashtra Public Health Department) कुटुंब नियोजन (Family planning) किटमध्ये ग्रामीण भागांमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी जर रबरी लिंग दिले असेल तर चुकीचे काहीच नाही. आशा वर्कर्सनेसुद्धा संकुचित विचार बाजूला ठेवून कुटुंबनियोजन करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. आम्ही हे कसे दाखवू, ग्रामीण भागातील महिला काय म्हणतील, असा जर आपण संकुचित विचार आता एकविसाव्या शतकात करत बसलो तर कुटुंब नियोजनाच्या गप्पा हवेतच राहतील.
Trupti Desai : ‘एकविसाव्या शतकात संकुचित विचार करत बसलो, तर कुटुंब नियोजनाच्या गप्पा हवेतच राहतील’#truptidesai #familyplanning #health #MaharashtraNews #Video अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/3zYOhRzy4v
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2022
काय आहे वाद?
लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपापाययोजना राबविले जात आहेत. त्यामध्ये राज्य सरकारच्या (Maharashtra Government) सार्वजनिक आरोग्य विभागाचा मोठा वाटा असतो. या विभागाकडून कुटुंब नियोजनाचा (family planning) उपक्रम सुद्धा राबवण्यात येतोय. मात्र, राज्य सरकारकडून कुटुंब नियोजनासाठीच्या समुपदेशन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे समोर आले, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर्स (Asha Worker) नाराज असून त्यांच्या समोर अजब पेच निर्माण झाला आहे. आशा सेविकांना ते रबरी लिंग घेऊन गावागावात फिरायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. यावर काही राजकीय पक्षांनी राजकारण करायलाही सुरुवात केली आहे. यावरच तृप्ती देसाई यांनी आपले मत व्यक्त केले आहे.