Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Maharaj : देहूतल्या तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या मंडपाचं झालं भूमिपूजन, 14 जूनला पंतप्रधान मोदी करणार मंदिराचं लोकार्पण

या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. हे मंदिर पूर्ण दगडात बांधले आहे. याची उंची साधारणपणे 42 फुटांपर्यंत आहे. यात तुकाराम महाराजांची मूर्ती त्यांच्या वयानुरूप बनविण्यात आली आहे. त्यांचे वय 42 आहे. यानुसार मंदिराची उंचीची 42 फूट ठेवण्यात आली आहे.

Tukaram Maharaj : देहूतल्या तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या मंडपाचं झालं भूमिपूजन, 14 जूनला पंतप्रधान मोदी करणार मंदिराचं लोकार्पण
देहूतील तुकाराम महाराजांचे शिळा मंदिरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 4:40 PM

देहू, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या 14 जूनला पुण्यातील देहू नगरीत येणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान हे वारकरी संप्रदायला संबोधित करणार आहेत. त्यासाठीच्या मंडपाचे भूमिपूजन आज पार पडत आहे. राम मंदिर निर्मितीचे कोशाध्यक्ष गोविंदगिरी महाराज आणि वारकरी संप्रदायाचे कुरेकर महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. काही दिवसांपूर्वीच देहू (Dehu) संस्थानाच्या विश्वस्तांना घेऊन भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत.

आनंदडोह येथून आणली शिळा

देहूच्या मंदिराचे विश्वस्त भानुदास महाराज मोरे याविषयी म्हणाले, की जगद्गुरू तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज आणि सर्व वारकऱ्यांनी जेव्हा तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले त्यानंतर आनंदडोह येथून शिळा म्हणजेच हा दगड आणला. त्या शिळेची नंतर येथे आणून पूजा केली. ही शिळा याठिकाणी स्थापन झाल्यापासून सर्व वारकरी संप्रदाय आणि संस्थान याठिकाणी पूजा करून महाराजांना यात पाहात होते.

शिळा मंदिराचा घेतलेला आढावा

…म्हणून संबोधले जाते शिळा मंदिर

आता या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. हे मंदिर पूर्ण दगडात बांधले आहे. याची उंची साधारणपणे 42 फुटांपर्यंत आहे. हेमाडपंथी हे मंदिर आहे. आपल्या वातावरणाला सुट होतील, असे दगड वापरण्यात आले आहेत, असे भानुदास महाराज मोरे यांनी सांगितले. आता 14 जूनला पंतप्रधान मोदी या मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर लोकार्पण करणार आहेत. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातुन तरल्या आणि वर आल्या. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नाही आणि 13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर (दगडावर) बसले होते ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे, म्हणून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जाते.

हे सुद्धा वाचा

कसे आहे मंदिर?

मंदिर रचना – हेमाडपंथी मूळ गर्भगृह 14×14 अंतर गर्भ गृह 9×9 उंची 17×12 *मंदिराची उंची 42 फूट *मूर्तीची उंची 42 इंच

वारीचा सोहळा 20 जूनपासून

पंतप्रधान मोदी 14 जूनला देहूत येणार आहेत आणि यंदाचा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 20 जूनपासून सुरू होईल. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे होऊ न शकलेला वारीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात होणार आहे. त्याआधीच पंतप्रधान देहूत येत असल्याने या दौऱ्याचे विशेष महत्त्व असेल. तर राज्यात आगामी काळात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या दौऱ्याला महत्त्व असणार आहे.

कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?.
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र.
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्.
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास.
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.